Nashik Lok Sabha Election : निवडणूक साहित्याच्या वाहतुकीवर 5 कोटींचा खर्च! एसटी महामंडळाला 2 कोटींचे उत्पन्न

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत कर्मचाऱ्यांवर साडेतीन कोटींचा खर्च झालेला असताना आता मतदान साहित्य वाहतुकीवर सुमारे पाच कोटी रुपये खर्च झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
5 crore spent on transportation of election materials
5 crore spent on transportation of election materialsesakal
Updated on

किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोकसभा निवडणुकीत कर्मचाऱ्यांवर साडेतीन कोटींचा खर्च झालेला असताना आता मतदान साहित्य वाहतुकीवर सुमारे पाच कोटी रुपये खर्च झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यातील दोन कोटी रुपये एकट्या एसटी महामंडळाला मिळाले. तीन कोटी रुपये खासगी वाहतूकदारांवर खर्च झाले आहेत. मतमोजणी अद्याप बाकी असल्याने हे साहित्य सय्यद पिंप्री येथील गुदामात ठेवण्याच्या खर्चाची भर यात पडेल. (5 crore spent on transportation of election materials)

नाशिक, दिंडोरी व धुळे लोकसभा मतदारसंघांसाठी २० मेस मतदान घेण्यात आले. मतदानाच्या एक दिवस आधी मतदान साहित्य प्रत्येक मतदान केंद्रावर पोहोचविण्यात आले. प्रत्येक केंद्रावर सहा कर्मचारी नियुक्त होते. त्यांच्यासह बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट, विविध प्रकारचे अर्ज असलेल्या पुस्तिका, शाई, पेन्सिल, पेन, टाचन पिन आदी पोतेभर साहित्य केंद्रावर पाठविले.

त्याचे काटेकोर नियोजन निवडणूक अधिकाऱ्यांनी केल्याने जिल्ह्यात मतदान प्रक्रियेत कुठेही बाधा निर्माण झाली नाही. बिघडलेले मशिन तत्काळ बदलून घेत प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यात प्रशासनाला यश आले. मतदान होईपर्यंत आणि मतदान झाल्यावर सर्व साहित्य ज्या वाहनांतून पाठविण्यात आले, त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाला पाच कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत.

एसटी महामंडळाच्या ५२४ बस व ९२ मिनी बस या ५५ रुपये प्रतिकिलो मीटरप्रमाणे भाडेतत्त्वावर वापरात आल्या. खासगी जीप, कार व ट्रक या ४५ ते ५० रुपये प्रतिकिलो मीटरदराने त्यांना भाडे मिळाले. महामंडळाच्या बसपेक्षा खासगी वाहनांची संख्या अधिक होती. त्यामुळे त्यावर जास्त खर्च झालेला दिसतो. (latest marathi news)

5 crore spent on transportation of election materials
Nashik Teachers Constituency : शिक्षक मतदारसंघात साडेसोळा हजार मतदारांची भर

या व्यतिरिक्त चालकाला भत्ताही देण्यात आला. ज्या ठिकाणी बस पोहोचणे शक्य नाही, अशा ठिकाणी खासगी जीप, कारचा वापर करण्यात आला. तालुकास्तरावर संकलित झालेले साहित्य ट्रकद्वारे नाशिकमधील मतमोजणी केंद्रापर्यंत पोहोचविण्यात आले. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी तीन ट्रकची व्यवस्था केलेली होती.

म्हणून खासगी गाड्यांना प्राधान्य

दिंडोरी व नाशिक लोकसभेत आदिवासीबहुल गावे आणि पाड्यांचा समावेश आहे. डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या या वाड्या-वस्त्यांवर आजही बस पोहोचणे शक्य नाही. त्याठिकाणी जीप, कारनेच जाणे शक्य असल्याने त्या ठिकाणी खासगी गाड्यांचा वापर करण्यात आला. यात दिंडोरी लोकसभेत जास्त गाड्यांचा वापर झाल्याचे दिसून येते.

"निवडणुकीच्या कामानिमित्त एसटी महामंडळाने दिलेल्या बसमुळे महामंडळाच्या उत्पन्नात भर पडली आहे. दोन दिवस बस व चालक पाठविण्यात आले होते. निवडणूक विभागाकडून महामंडळाला पैसेही प्राप्त झाले आहेत." - अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, नाशिक

5 crore spent on transportation of election materials
Nashik News : नांदगावला खळबळ! लाच देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून लष्करातील जवानाच्या वडिलांची गांधीगिरी

वाहतुकीचे नियोजन

विधानसभा मतदारसंघ..................बस.........मिनी बस..........जीप........कार......ट्रक

नांदगाव.................३७.............३...................८..............१.........३

मालेगाव मध्य.........२४............०...................०..............२५........३

मालेगाव बाह्य.........३९............०...................६६.............३०.......३

बागलाण.................३१............६...................४................१..........३

कळवण-सुरगाणा...................४१............०...................११६..........०...........३

चांदवड-देवळा....................४१............०...................४३.............१...........३

येवला......................४०............११.................४०.............१............३

सिन्नर....................४४............७...................८................१............३

निफाड....................३७...........७.....................१५.............२............३

दिंडोरी-पेठ.....................३७...........०......................२०............५............३

नाशिक पूर्व............३४.............२४..............३३.................१............३

नाशिक मध्य..........२२..............०..............३८..................५.............३

नाशिक पश्‍चिम.......३२.............०..............४३.................५..............३

देवळाली...................३८............०...............५३.................५..............३

इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर.................२७..............५................११................१...............३

एकूण.....................५२४...........९२..............४९८............८४.............४६

5 crore spent on transportation of election materials
Nashik News : फसवणूक टाळण्यासाठी बँक - पोलिस समन्वयावर भर; बँक अधिकार्यांची संयुक्त बैठक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.