Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता इच्छुक उमेदवारांनी मतदारांची आकडेमोड करण्यास सुरवात केली आहे. नाशिक जिल्ह्यातील एकूण ४७ लाख ४८ हजार मतदारांपैकी ३१ लाख ४२ हजार (६६ टक्के) मतदार हे पन्नासच्या आत असल्यामुळे युवक व प्रौढ व्यक्तींच्या हातीच ही निवडणूक असणार आहे. लोकसभा निवडणुकीत नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. (Nashik Lok Sabha Election 66 percent voters in district are under fifty marathi news)
त्यादृष्टीने राजकीय मोर्चेबांधणी आत्तापासून सुरु झाल्याचे दिसून येते. नेत्यांनी मतदारसंघाचे दौरे सुरू केले आहेत. काही ठिकाणी अजूनही उमेदवारीचा खल चालू आहे. जिल्ह्यातील एकूण मतदारांमध्ये २४ लाख ७४ हजार पुरुष तर, २२ लाख ७३ हजार महिलांचे प्रमाण आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या गुणोत्तराचा विचार केल्यास कळवण-सुरगाणा या आदिवासी बहुल विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक आहे.
येथे एक हजार पुरुषांमागे ९६५ इतक्या महिला आहेत. सर्वात कमी प्रमाण नाशिक पश्चिम या शहरातील मतदारसंघात दिसून येते. इथे केवळ ८५८ इतके लिंग गुणोत्तर आहे. तृतीयपंथी मतदारांच्या नाव नोंदणीसाठी जिल्हा निवडणूक विभागाने महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, गृहनिर्माण सोसायट्या यांचे सहकार्य घेतले.
त्यामुळे मतदार यादीतील स्त्री-पुरुष गुणोत्तर ९१३ वरून ९१९ इतके वाढले आहे. वाढलेल्या मतदारांमध्ये नवमतदारांचे प्रमाणही अधिक आहे. दोन लाख १४ हजार नवमतदारांची नोंदणी झाली असून, १८ ते २२ वयोगटातील हे मतदार आहेत. (latest marathi news)
वयोगटनिहाय मतदार
वयोगट.......मतदार......टक्के
१८-१९.......५९३१४........१.२५
२०-२९........८८८४१६......१८.७५
३०-३९........१०९७६५६.....२३.१२
४०-४९........१०९६७७४......२३.१
५०-५९.......७४१३९२.........१५.६२
६०-६९.........४७७९०५......१०.०६
७०-७९.........२५३८६१......५.३५
८०+...........१३२५३२.......२.७९
एकूण........४७,४७७०५......१००
लिंग गुणोत्तर
तालुका............वर्ष २०२३.......... वर्ष २०२४
नांदगाव...........९०१...........९०४
कळवण...........९५६...........९६५
चांदवड............९०१..........९०८
येवला.............८९८.........९०७
निफाड............९३९.........९४२
दिंडोरी.............९७३..........९४४
नाशिक पूर्व......९३०.........९३४
नाशिक मध्य..........९५५........९६०
नाशिक पश्चिम.......८५५........८५८
देवळाली..........९१४........९२१
इगतपुरी-त्र्यंबक.....९४२.......९४९
सिन्नर...........९००..........९०४
मालेगाव मध्य....९१६........९१९
मालेगाव बाह्य....८९९......९०१
बागलाण.............९०१.......९०५
एकूण................९१३.........९१९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.