Nashik Lok Sabha Election : उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात होणार बंद; प्रशासन सज्ज, सोशल मीडियावर प्रचार

Lok Sabha Election : लोकसभेच्या नाशिकसह दिंडोरी व धुळे मतदारसंघासाठी सोमवारी (ता.२०) मतदान होत आहे.
Election Decision Officer Babasaheb Pardhe and colleagues.
Election Decision Officer Babasaheb Pardhe and colleagues.esakal
Updated on

Nashik Lok Sabha Election : लोकसभेच्या नाशिकसह दिंडोरी व धुळे मतदारसंघासाठी सोमवारी (ता.२०) मतदान होत आहे. मतदानाची संपूर्ण तयारी प्रशासनाने केली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात २० लाख ३३ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात १८ लाख ५३ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. नाशिकमध्ये १९१० तर दिंडोरीत १९२२ मतदान केंद्रांवर सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत मतदान होईल. (Administration ready campaign on social media )

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. नाशिकमध्ये इगतपुरी विधानसभा मतदारसंघात दोन तर दिंडोरीत सुरगाणा लोकसभा मतदारसंघात दोन असे एकूण चार मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण ३१ उमेदवार आहेत. यात कागदावर चौरंगी लढत दिसत असली तरी प्रत्यक्षात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे.

सर्व उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होईल त्यानंतर चार जून रोजी मतमोजणी होईल. मतदानानंतर अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये केंद्र सरकारच्या वेअर हाऊसमध्ये ईव्हीएम मशिन जमा होतील. नाशिक व दिंडोरी मिळून सात हजार ईव्हीएम मशिन आहेत. नाशिकमध्ये १९१० मतदान केंद्रे आहेत. एका मतदान केंद्रावर दोन ईव्हीएम मशिन ठेवले जाणार आहेत.

संवेदनशील मतदान केंद्र अशी

नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये दोन संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. त्यात इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील बोरटेंबे व वाळण येथे गेल्या निवडणुकीमध्ये दहा टक्के मतदान झाले होते. त्यामुळे मतदान केंद्र संवेदनशील यादीत आले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघांमध्ये दोन संवेदनशील केंद्रे आहेत. (latest marathi news)

Election Decision Officer Babasaheb Pardhe and colleagues.
Nashik Lok Sabha Election : मतदान केंद्रात मोबाईलसह कोणतीही वस्तू नेण्यास मज्जाव

यात सुरगाणा विधानसभा क्षेत्रातील अलंगून तर याच क्षेत्रातील मालगव्हाण हे संवेदनशील केंद्र आहे. अलंगून येथे ९५ टक्के मतदान मागील निवडणुकीत झाले होते व त्यातील ७५ टक्के मतदान जे. पी. गावित यांना झाले. त्यामुळे या मतदान केंद्राचा समावेश संवेदनशील यादीत झाला.

नाशिकमध्ये चौरंगी लढत

दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण रविवारी तापले होते. दुपारनंतर सोशल मीडियावर जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना महाविकास आघाडी व महायुतीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये सरळ सामना रंगला.

महाविकास आघाडीकडून राजाभाऊ ऊर्फ पराग वाजे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर महायुतीचे हेमंत गोडसे हे रिंगणात आहेत. अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारासमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे. वंचित बहुजन आघाडीकडून करण गायकर हे उमेदवारी करत असल्याने नाशिकमध्ये चौरंगी लढत होत आहे.

दिंडोरीत दुरंगी लढत

दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण १० उमेदवार रिंगणात असले तरी, महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे भास्कर भगरे यांच्यात दुरंगी लढत होत आहे. माकपचे जे. पी. गावित यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. तर, भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी माघार घेतल्याने महायुतीच्या उमेदवाराची मत विभागणी टळली आहे.

Election Decision Officer Babasaheb Pardhe and colleagues.
Nashik Lok Sabha Election : मतदान केंद्रावर मिळणार प्राथमिक उपचार; जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.