Nashik Lok Sabha Election : भाजपच्या धक्का तंत्राने शिंदे गटाला झटका

Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अद्याप जागा कोणाला सोडली गेली आहे
chhagan bhujbal and hemant godse
chhagan bhujbal and hemant godseesakal
Updated on

Nashik Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अद्याप जागा कोणाला सोडली गेली आहे, याबाबत निश्चितता नसताना शिंदे सेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी रंगपंचमीचा मुहूर्त साधत शालिमार येथील पटेल मारुती मंदिरात पूजा, शक्तिप्रदर्शन केल्याने महायुतीत बेबनाव निर्माण झाला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडून चर्चेत असलेल्या छगन भुजबळ यांनी देखील मला नाशिकमधून तयारी करण्यास सांगण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिल्याने शिंदे गटासाठी हा धक्का मानला जात आहे. (Nashik Lok Sabha Election BJP Given explanation to Shinde group marathi news)

लोकसभेसाठी राज्यातील पाच जागांचा तिढा अद्यापही सुटत नाही, त्यात नाशिकच्या जागेचा समावेश आहे. नाशिकमधील जागा पारंपरिक पद्धतीने शिवसेनेलाच मिळाली पाहिजे, असा आग्रह पूर्वीपासून आहे. मात्र अचानक महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आल्याने नाशिकच्या राजकारणात रंगत वाढली.

भाजपच्या या धक्का तंत्रामुळे सर्वाधिक मोठा झटका शिवसेनेच्या शिंदे गटाला बसला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय बंगल्यावर, तसेच ठाणे येथील खासगी बंगल्यावर नाशिक येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत जागेसाठी आग्रह धरला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील नाशिकची जागा आपल्यालाच मिळेल, असा शब्द दिला.

मात्र भुजबळ यांचे नाव अधिक तीव्रतेने समोर येत असताना शिंदे सेनेचा आत्मविश्वास मात्र कमी होताना दिसत आहे. त्यामुळेच महायुतीकडून नाशिकच्या जागेवर कोणाला उमेदवारी द्यावी, याबद्दल निश्चिती नसताना खासदार गोडसे यांच्यासह नाशिकच्या शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रंगपंचमीच्या दिवशी ३० मार्चला शक्तिप्रदर्शन करत शालिमार येथील पटेल मारुती मंदिरात महाआरती केली.  (latest marathi news)

chhagan bhujbal and hemant godse
Nashik Lok Sabha Election : गद्दारांना धडा शिकवा; वाजेंच्या भेटीत उद्धव ठाकरे यांचे आवाहन

या वेळी विद्यमान खासदार गोडसे यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळणार असल्याचा दावा केला. परंतु दुसरीकडे नाशिकची जागा शिवसेनेलाच सोडली असून, खासदार गोडसे यांचे उमेदवार म्हणून नाव जाहीर होत नसल्याने अद्यापही संभ्रम कायम असल्याचे दिसून येत आहे.

गोडसे पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

खासदार गोडसे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले. मात्र मुख्यमंत्री नॉट रिचेबल असल्याने त्यांना पुन्हा परतावे लागल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना महायुतीकडून मलाच उमेदवारी देण्यात आल्याची माहिती दिली.

''तिकिटासाठी माझा आग्रह नव्हता; परंतु महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत चर्चा झाली. त्या वेळेला नाशिकमधून माझे नाव पुढे आले. मला देखील कल्पना नव्हती. महायुतीच्या वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर हे खरे आहे का विचारले, तर त्यावेळेस त्यांनी खरे असल्याचे सांगितले. मला उभं राहावे लागेल, अशा स्पष्ट सूचना दिल्या.''- छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठामंत्री

chhagan bhujbal and hemant godse
Nashik Lok Sabha Election : नाशिक मतदारसंघात सस्पेन्स कायम, इच्छुक उमेदवार नाशकात परतले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.