Nashik Lok Sabha Election : पोलिस आयुक्तालय हद्दीत मध्यरात्री नाकाबंदी

Lok Sabha Election : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता.१९) रात्री नऊ ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत नाकाबंदी करण्यात आली.
police
policeesakal
Updated on

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता.१९) रात्री नऊ ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत नाकाबंदी करण्यात आली. त्याचप्रमाणे, शहरातील मतदार केंद्र असलेल्या इमारतीच्या एक किमी अंतरात सेक्टर पोलिस अधिकाऱ्यांकडून नाकाबंदी करीत तपासणी मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, नाशिकरोड आणि सिडको परिसरातील संवेदनशील केंद्र अधिक असल्याने याठिकाणी पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे. ( Blockade at midnight in Police Commissionerate limits )

नाशिक लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्‍यांनी कंबर कसली आहे. निवडणुकीतील चुरस वाढल्याने यामध्ये मतदारांना प्रलोभन दाखवून आपल्या बाजूने मतदान करण्यासाठी पैशांचे वाटप केले जण्याची मोठी शक्यता आहे. प्रामुख्याने झोपडपट्टी, उपनगरी भाग, कामगार वसाहती या भागात पैसे वाटपाचे प्रमाण मोठे राहते.

मतदानाच्या आदल्या रात्री तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी पैसे वाटपास मोठा वेग येत असल्याचा अनुभव असल्याने हे गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांसह पोलिस यंत्रणाही सतर्क आहे. यासाठी पोलिसांची भरारी पथके तयार करण्यात आली असून ते प्रामुख्याने झोपडपट्टी भागांमध्ये गस्त घालणार आहेत. (latest marathi news)

police
Nashik Lok Sabha Election : मतदान केंद्रात मोबाईलसह कोणतीही वस्तू नेण्यास मज्जाव

कडक नाकाबंदी

पैसे वाटपाचा गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांसह कडक नाकाबंदीचे नियोजन करण्यात आले. प्रचाराची मुदत संपल्यानंतर मतदानापूर्वीच्या ४८ तासात मतदार संघाबाहेरील व्यक्ती मतदार संघात येणार नाही याबाबत दक्षता घेण्यात येत आहे. रविवारी रात्री ९ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत शहरात पोलिसांनी नाकाबंदी केली. पैसे वाटपासाठी बाहेरून शहरात दाखल होणाऱ्‍या वाहनांची कडक तपासणी नाकाबंदी दरम्यान केली आहे. यासाठी शहरात सर्व प्रमुख मार्गांवर १०७ तपासणी नाके उभारण्यात आले आहेत.

''कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी पोलिस आयुक्तालयाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली गेली. कोणताही अनुचित प्रकार घडत असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.''- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, गुन्हेशाखा.

police
Nashik Lok Sabha Election : प्रचार संपला, विरोधाची धग कायम!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.