Nashik Lok Sabha Election : त्र्यंबकेश्वर येथील मतदान केंद्रात नाशिक लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्याविरोधात ‘इव्हिएम’ मशिनला पुष्पहार अर्पण केल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात नियमाचा भंग केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. ( case has been registered in police against Shantigiriji Maharaj )
त्र्यंबकेश्वरचे नायब तहसिलदार ठकाजी वामन महाले यांच्या फिर्यादीनुसार, नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज सोमवारी (ता. २०) सकाळी सात वाजता त्यांच्या पंचवीस-तीस कार्यकर्त्यांसह त्र्यंबकेश्वर येथील मविप्र महाविद्यालयातील मतदान केंद्रावरील १०५ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर पोहोचले. मतदानासाठी कक्षात प्रवेश केल्यानंतर शांतीगिरी महाराजांनी स्वत:च्या गळ्यातील फुलांचा हार मतदान कक्षातील ‘इव्हीएम’च्या बॉक्सला घातला.
यावेळी मतदान केंद्रातील पोलिसांनी त्यांना मनाई केली होती. यासंदर्भात सहायक निवडणूक अधिकारी सुधीर खांदे यांच्याकडे लेखी अहवाल देण्यात आला. त्यानुसार, त्यांनी तातडीने नायब तहसिलदारांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मतदान कक्षात हार आढळून आला आहे. त्यानुसार मतदान केंद्र अध्यक्ष धनंजय बाऱ्हे व इतर कर्मचाऱ्यांना न जुमानता मतदान केंद्रात गैरवर्तन व निवडणूक आयोगाच्या आदर्श नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी शांतिगिरी महाराजांविरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबड पोलिसातही गुन्हा दाखल
अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्या कार्यकर्त्यांच्याविरोधात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित भागवत निंबा निकम (६१ रा. चाळीसगाव), संदीप श्रावण पाटील (४७), विष्णू कारभारी करवट, पांडुरंग बाबुराव सदगीर (३८, रा. येवला) अशी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत.
पोलिस उपनिरीक्षक संदेश पाडवी यांच्या फिर्यादीनुसार, रायगड चौकातील मतदान केंद्रालगत शांतिगिरी महाराज यांचे कार्यकर्ते सोमवारी (ता. २०) सकाळी नऊच्या सुमारास ‘जय बाबाजी’ नाव लिहिलेले भगवे कपडे परिधान करुन मतदारांना चिठ्ठ्या वाटत होते. त्या चिठ्ठ्यांवरही शांतिगिरी महाराज यांचे निवडणूक चिन्ह होते. शांतिगिरी महाराज यांनी अंबड पोलिस ठाणे गाठून पोलिसांची चर्चा केल्यानंतर कार्यकर्त्यांना समज देत सोडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.