Nashik Lok Sabha Election : जिल्ह्याच्या विकासासाठी 17 खासदारांचेही योगदान

Lok Sabha Election : जिल्ह्याच्या विकासासाठी राज्यसभेच्या तब्बल १७ खासदारांनीही विविध विकासकामांसाठी निधी दिलेला आहे.
 nashik Lok Sabha Election
nashik Lok Sabha Electionesakal
Updated on

विकास गामणे ः सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : जिल्ह्याच्या विकासासाठी राज्यसभेच्या तब्बल १७ खासदारांनीही विविध विकासकामांसाठी निधी दिलेला आहे. पाच वर्षांत विविध लेखाशीर्षकाखाली जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेत हा निधी प्राप्त झाला. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आता या खासदारांचे निधी वितरणासाठी खुले करण्यात आलेले खाते बंद करण्यात आले. (Nashik Lok Sabha Election Contribution of 17 MP for development of district marathi news)

यात अखर्चित निधी पुन्हा शासन दरबारी पाठविण्याची लगभग जिल्हा परिषदेत सुरू आहे. खासदारांना विकासकामांसाठी दरवर्षी पाच कोटींचा निधी उपलब्ध होतो. २०१९-२० मध्ये प्रत्येकी पाच कोटींचा निधी मिळाला. मात्र, कोरोनामुळे २०२०-२१ मध्ये निधी दिला गेला नाही. २०२१-२२ साठी केवळ दोन कोटी निधी देण्यात आला होता. त्यानंतर, उर्वरित दोन वर्षांसाठी प्रत्येकी पाच याप्रमाणे दहा कोटी निधी मिळाला.

प्राप्त होणारा हा निधी जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकामसह विविध विभागांकडून विकासकामांसाठी खर्च करण्यात आला आहे. याशिवाय, अन्य लेखाशीर्षकाखाली या खासदारांनी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात निधी आणला. लोकसभेप्रमाणे राज्यसभेच्या खासदारांनाही विकासकामांसाठी दरवर्षी दोन कोटींचा निधी उपलब्ध होतो. राज्यसभेच्या खासदारांना हा निधी कोणत्याही मतदारसंघात देण्याची मुभा असते. (latest marathi news)

 nashik Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election : 383 पेक्षा जास्त उमेदवार असल्यास निवडणूक रद्द? जिल्हाधिकारी मागवू शकतात मार्गदर्शन

त्यामुळे राज्यसभेच्या १७ खासदारांनी जिल्ह्याला विकासनिधी उपलब्ध करून दिलेला आहे. नेमका किती निधी प्राप्त झाला, याची आकडेवारी अद्याप उपलब्ध झालेली नाही. गत पाच वर्षांत विविध लेखाशीर्षकाखाली हा निधी जिल्ह्याला मिळाला असून, त्यातून कामे झाली आहेत. प्रामुख्याने रस्ते, बंधारे, सभामंडप आदींसाठी हा निधी खर्च झाला आहे.

यात जिल्हा परिषद यंत्रणेमार्फत यातील बहुतांश निधी वितरित होऊन खर्च झाला आहे. त्यासाठी या खासदारांचे खाते उघडण्यात आले होते. आता निवडणूक आचारसंहिता लागल्याने हे खाते बंद करण्यात आले. यातील खर्च न झालेला निधी शासनाकडे पाठविण्यासाठी प्रशासनाची लगबग सुरू आहे.

या खासदारांनी दिला निधी

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, विकास महात्मे, विनय सहस्रबुद्धे, व्ही. मुरलीधरन, अमर साबळे, प्रा. नरेंद्र जाधव, पी. चिदंबरम, कुमार केतकर, सुब्रमण्यम स्वामी, हुसेन दलवाई, अनुराग ठाकूर, प्रफुल्ल पटेल, डी. पी. त्रिपाठी, वंदना चव्हाण, छत्रपती संभाजीराजे, संजय राऊत.

 nashik Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election : ‘लहरी‘ मतदारसंघात दुभंगलेल्या शिवसेनेची कसोटी; भाजप एक तर बीएलडीचाही प्रभाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.