Nashik Police : सोशल मीडियावर सायबर पोलिसांचा ‘वॉच’! आक्षेपार्ह पोस्ट, अफवा पसरविल्यास कारवाई

Nashik News : मतमोजणी दरम्यान सोशल मीडियावर काही यूजर, कार्यकर्ते, समाजकंटक जातीय तेढ, धार्मिक व राजकीय विचारधारेच्या कमेंटस्, पोस्ट टाकण्याची शक्यता आहे.
Cyber ​​police watch on social media Action for spreading offensive posts rumours
Cyber ​​police watch on social media Action for spreading offensive posts rumoursesakal
Updated on

Nashik News : नाशिक, दिंडोरी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (ता. ४) होत असून, सायंकाळपर्यंत दोन्ही मतदारसंघाचे निकाल जाहीर होतील. मतमोजणी दरम्यान सोशल मीडियावर काही यूजर, कार्यकर्ते, समाजकंटक जातीय तेढ, धार्मिक व राजकीय विचारधारेच्या कमेंटस्, पोस्ट टाकण्याची शक्यता आहे. ही बाब घेत शहर आणि ग्रामीण पोलिसांची सायबर सेल अलर्टमोडवर आली आहेत. (Cyber ​​police watch on social media Action for spreading offensive posts rumours)

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट वा तेढ निर्माण करणारे संदेश व्हायरल केल्यास सायबर पोलिसांकडून कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील ‘ॲडमिन’ देखील अडचणीत सापडण्याची शक्यता असल्याने ग्रुपवर लक्ष ठेवण्याचे व आक्षेपार्ह संदेश असेल तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले.

अंबड येथील वेअर हाऊसमध्ये मंगळवारी सकाळी आठला मतमोजणीला सुरवात होणार आहे. अतिशय अटीतटीच्या या लढतीवर जिल्ह्याचे नव्हेतर राज्याचे लक्ष आहे. त्यामुळे, उत्साही राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी, कट्टर समर्थक सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, मेजेस, कमेंट करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे अशा संशयित यूजरसह व्हाटस्अॅप, त्यातील विविध ग्रुप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम व ट्विटर अकाऊंट, फेसबुक प्रोफाइलवर सायबर पोलिसांनी करडी नजर ठेवली जात आहे. आक्षेपार्ह कमेंट, पोस्ट व्हायरल केल्यास संबंधितावर तत्काळ कठोर कारवाई केली जाणार आहे. शहर आणि ग्रामीणच्या सायबर सेलची विविध पथके यासाठी अलर्ट मोडवर असून सायबर सर्फिंगद्वारे नजर ठेवून आहेत. (latest marathi news)

Cyber ​​police watch on social media Action for spreading offensive posts rumours
Nashik News : आपत्ती निवारणासाठी 166 कोटींचे प्रस्ताव; जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी

या आहेत सूचना
- निकाल जाहीर झाल्यावर संयम बाळगावा
- आनंदोत्सव साजरा करताना नियमांचे पालन करावे
- कोणत्याही समाज, जाती-धर्माच्या भावना दुखावतील अशा पोस्ट, स्टेटस, व्हायरल करू नये
- कोणाही विरोधात घोषणाबाजी करु नये
- डिजे वाजविण्यास बंदी
- विनापरवानगी विजयी मिरवणूक काढल्यास कारवाई

"लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, कमेंट करू नये. तसे आढळून आल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई केली जाईल. सायबर पोलिस पथकाची करडी नजर सोशल मीडियावर राहणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्यक्त होताना काळजी घ्यावी अन्यथा पोलिस आपले काम करतील." - संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक.

Cyber ​​police watch on social media Action for spreading offensive posts rumours
Nashik Pre-Monsoon Rains : सिन्नर तालुक्यातील पूर्वसह अन्य भागात मान्सून पूर्व पावसाची हजेरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.