Nashik Lok Sabha Election : आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा आज बसणार; प्रचारासाठी सायंकाळी सहापर्यंत मुदत

Lok Sabha Election : शनिवारी सायंकाळी सहाला जाहीर प्रचार बंद होणार असल्याने तोपर्यंत मैदान गाजवण्यासाठी महायुती, महाविकास आघाडीसह वंचित बहुजन आघाडीचे नेते नाशिकमध्ये येणार आहेत.
Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency esakal
Updated on

Nashik News : महिनाभरापासून प्रचारानिमित्त नेत्यांकडून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा शनिवारी (ता. १८) खाली बसणार आहे. शनिवारी सायंकाळी सहाला जाहीर प्रचार बंद होणार असल्याने तोपर्यंत मैदान गाजवण्यासाठी महायुती, महाविकास आघाडीसह वंचित बहुजन आघाडीचे नेते नाशिकमध्ये येणार आहेत. (Deadline for campaigning is till 6 pm)

त्यानंतर शनिवारी व रविवारी चालणाऱ्या ‘अंडरग्राउंड’ प्रचारावर प्रशासनाची करडी नजर असणार आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिक, दिंडोरी व धुळे लोकसभेसाठी सोमवारी (ता. २०) मतदान होत आहे. या मतदारसंघांचे मतदान पाचव्या टप्प्यात आल्यामुळे अगदी अखेरच्या टप्प्यात सभांना रंगत आली.

महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सभा घेतल्या. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, अमोल कोल्हे, सक्षणा सलगर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी जोरदार सभा घेत मतदारांसमोर आपले मुद्दे मांडले.

पक्षाच्या विविध आघाड्यांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर छोटेखानी सभा घेऊन उमेदवारांचा प्रचार केला. रोड शो, मोटारसायकल रॅली या माध्यमातून प्रचारात रंगत आणली गेली. शेवटच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबडेकर दोन ठिकाणी सभा घेत आहेत. पिंपळगाव बसवंत येथे आदित्य ठाकरे, संजय राऊत, अमोल कोल्हे, सक्षणा सलगर यांची भास्कर भगरे यांच्यासाठी सांगता सभा होणार आहे.

महिन्याभरापासून उडालेला प्रचाराचा धुराळा शनिवारी सायंकाळी सहाला खाली बसणार आहे. पुढील दोन दिवस शांतता राहणार असून, सोमवारी (ता. २०) सकाळी सातपासून मतदानास प्रारंभ होईल. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन पूर्णत: सज्ज झाले असून, प्रत्येक केंद्रनिहाय कर्मचारी, अधिकाऱ्याची नियुक्ती केल्यामुळे त्यांनाही मतदानाबाबात उत्सुकता आहे. (latest marati news)

Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Election : सिन्नरला उद्याचा आठवडे बाजार बंद!

प्रशासनासह मतदान केंद्रावर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारांकडून सूचना दिल्या जात आहेत. मतदार आपल्याकडे कसा येईल, यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. मतदारांना कुठल्याही प्रकारचे प्रलोभन दिले जाऊ नये, यासाठी प्रशासनाने नाशिक व दिंडोरीत एकूण ४४ भरारी पथके नियुक्त केली आहेत.

८२ स्थायी पथके, २४ चलचित्र सर्वेक्षण पथके, १२ चलचित्र निरीक्षण पथके, १६ आंतरजिल्हा तपासणी पथके नियुक्त करून मद्य, पैसे व वस्तूवाटपावर लक्ष ठेवले जात आहे. भरारी व स्थायी पथकांमध्ये केंद्रीय पोलिस दलाचे सदस्य समाविष्ट आहेत.

नेते नाशिक, दिंडोरीमध्ये तळ ठोकून

महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये ‘काटे की टक्कर’ होत असल्याने दोन्ही बाजूंचे दिग्गज नेते नाशिक व दिंडोरीत तळ ठोकून आहेत. आपल्या सहकारी पक्षाच्या स्थानिक नेत्यांना, आमदारांना सूचना देऊन प्रचाराची गती वाढवली जात आहे. त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी भाजपने राज्याबाहेरील व्यक्तींच्या हाती सूत्रे दिल्याचे समजते, तर नाशिकमध्ये ठाण्यातील व्यक्तीकडे सूत्रे सोपवल्याचे सांगण्यात येते.

Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency : डॉ. भारती पवार यांच्यासाठी नितीन गडकरींची ‘बॅटींग’

याठिकाणी नेत्यांच्या होणार सभा

- वंचित बहुजन आघाडी ः प्रकाश आंबेडकर- सकाळी अकरा : अंबिका स्वीटजवळ, सातपूर, नाशिक

- वंचित बहुजन आघाडी ः प्रकाश आंबेडकर- दुपारी एक : इंद्रप्रस्थ लॉन्स, घोटी टोल नाका, इगतपुरी

दिंडोरी : संजय राऊत, आदित्य ठाकरे, अमोल कोल्हे, सक्षणा सलगर- दुपारी दोन ः निफाड एज्युकेशन सोसायटीचे पिंपळगाव हायस्कूल

Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency : सिन्नर विधानसभा मतदारसंघात जनमत स्थानिकाच्या बाजूने

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.