Nashik Lok Sabha Election : नाशिकच्या 29, दिंडोरीच्या 8 उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त!

Nashik News : नाशिक लोकसभा मतदारसंघातील तब्बल २९ उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त झाले. यात शांतिगिरी महाराज, वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर यांच्यासह इतर स्थानिक पक्ष व अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
Deposit seized
Deposit seized esakal
Updated on

Nashik News : नाशिक व दिंडोरीत विद्यमान खासदारांना पराभवाची धूळ चारत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी जिल्ह्यात परिवर्तन घडवून आणले आहे. परिवर्तनाच्या या लाटेत नाशिक लोकसभा मतदारसंघातील तब्बल २९ उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त झाले. यात शांतिगिरी महाराज, वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर यांच्यासह इतर स्थानिक पक्ष व अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. (Nashik Lok Sabha Election)

विशेष म्हणजे शांतिगिरी महाराजांपेक्षा करण गायकर यांना जास्त मते मिळाली. दिंडोरीत दहापैकी आठ उमेदवारांचा दारुण पराभव झाल्याने त्यांचेही ‘डिपॉझिट’ निवडणूक आयोगाकडे जप्त झाले आहे. यात बाबू भगरे या अपक्ष उमेदवारास एक लाखावर मते मिळवूनही त्यांना स्वत:ची ‘अनामत’ वाचविता आली नाही.

निवडणूक म्हटले की उमेदवारांना किती मते मिळाली, यावरून त्यांची ‘पत’ ठरते. उमेदवाराचे ‘डिपॉझिट’ जप्त होणे म्हणजे मानहानीकारक पराभव समजला जातो. ‘डिपॉझिट’ वाचविण्यासाठी उमेदवारांना एकूण वैध मतांच्या १/६ म्हणजेच १६.६६ टक्के मते मिळविणे आवश्‍यक आहे. नाशिक लोकसभेत एकूण १२ लाख ३३ हजार २५२ वैध मतदान झाले. म्हणजेच उमेदवाराला आपली पत राखण्यासाठी दोन लाख पाच हजार ५४२ मतांची आवश्‍यकता आहे.

विजयी उमेदवार राजाभाऊ वाजे व माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या व्यतिरिक्त एकाही उमेदवाराला मतांचा हा कोटा पूर्ण करता आला नाही. अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांना तर वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर यांच्यापेक्षाही कमी मते मिळाली. यामुळे त्यांचा दारुण पराभव झाला, असेच आपण म्हणू शकतो. दिंडोरीत एकूण १२ लाख ४१ हजार ९८५ मते वैध ठरली. (latest marathi news)

Deposit seized
Nashik Lok Sabha Election 2024 Result : राजाभाऊ वाजेंची विजयी मिरवणूक

त्यामुळे येथील उमेदवारांना ‘डिपॉझिट’ वाचविण्यासाठी दोन लाख सहा हजार मतांची गरज होती. परंतु, विजयी उमेदवार भास्कर भगरे व पराभूत उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या व्यतिरिक्त एकही उमेदवार हा कोटा पूर्ण करू शकला नाही. विशेष म्हणजे केवळ एकसारखे नाव असलेले बाबू भगरे यांना तब्बल एक लाख मते मिळाली. पण, त्यांचेही ‘डिपॉझिट’ जप्त होणार आहे. याव्यतिरिक्त एकही उमेदवार २० हजार मतांपर्यंत पोहोचू शकलेला नाही.

डिपॉझिट जप्त झालेले नाशिकचे उमेदवार

अरुण काळे, अमोल कांबळे, कमलाकर गायकवाड, करण गायकर, कांतिलाल जाधव, कैलाश चव्हाण, जय‍श्री पाटील, ॲड. झुंजार आव्हाड, दर्शन मेढे, भाग्यश्री अडसूळ, यशवंत पारधी, वामन सांगळे, अरिफ मन्सुरी, कनोजे गिरधारी, कोळप्पा धोत्रे, गणेश बोरस्ते, चंद्रकांत ठाकूर, चंद्रभान पूरकर, जितेंद्र भाभे, तिलोत्तमा जगताप, दीपक गायकवाड, देवीदास सरकटे, धनाजी टोपले, शांतिगिरी महाराज, सचिनराजे देवरे, सिद्धेश्‍वरानंद सरस्वती, सुधीर देशमुख, सुषमा गोराणे, सोपान सोमवंशी.

दिंडोरी लोकसभा

तुळशीराम खोटरे, किशोर डगळे, गुलाब बर्डे, मालती ढोमसे, भारत पवार, अनिल बर्डे, दीपक जगताप, बाबू भगरे.

Deposit seized
Nashik Lok Sabha Election 2024 Result : भगरे यांच्या विजयाने ‘राष्ट्रवादी’चा वनवास संपला! पहिल्या निवडणुकीत भगरे दिल्लीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.