Dindori Lok Sabha Election Result : नाशिकच्या आधी दिंडोरीचा उडणार गुलाल; दिंडोरीचा निकाल दुपारी दोनपर्यंत

Lok Sabha Constituency : दिंडोरी लोकसभेत मतमोजणीच्या एकूण २६ फेऱ्या, तर नाशिकमध्ये सर्वाधिक ३० फेऱ्या होणार असल्याने नाशिकच्या आधी दिंडोरीचा गुलाल उधळण्यात येईल.
Dindori Lok Sabha Election Result
Dindori Lok Sabha Election Resultesakal
Updated on

Nashik News : लोकसभा निवडणुकीच्या निकालाविषयी विविध समाज माध्यमांनी कौल जाहीर केल्यामुळे मंगळवारी (ता. ४) जाहीर होणाऱ्या निकालाविषयी सर्वांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. दिंडोरी लोकसभेत मतमोजणीच्या एकूण २६ फेऱ्या, तर नाशिकमध्ये सर्वाधिक ३० फेऱ्या होणार असल्याने नाशिकच्या आधी दिंडोरीचा गुलाल उधळण्यात येईल. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात समाविष्ट सहा विधानसभा मतदारसंघांची एकाच वेळी ८४ टेबलांवर मतमोजणी होणार आहे.

प्रत्येक फेरीत ४० ते ४५ हजारांपर्यंत मतमोजणी होईल. त्यामुळे दुपारी दोनपर्यंत दिंडोरीचा, तर दुपारी चारपर्यंत नाशिकचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची एकाच ठिकाणी मतमोजणी होणार आहे. अंबड एमआयडीसीतील केंद्रीय वखार महामंडळाच्या गुदामात मंगळवारी सकाळी आठला मतमोजणीस प्रारंभ होईल.

जिल्हाधिकारी जलज शर्मा व दिंडोरीचे निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे, उपनिवडणूक जिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी सोमवारी (ता. ३) मतमोजणी केंद्रास भेट दिली. प्रत्येक मतमोजणी केंद्राची पाहणी करत केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. नाशिक लोकसभेसाठी ६०.७५ टक्के, तर दिंडोरीसाठी ६६.७५ टक्के मतदान झाले आहे. नाशिकमध्ये एकूण ३१ उमेदवार रिंगणात आहेत.

दिंडोरीत दहा उमेदवार आहेत. त्यामुळे नाशिकच्या मतमोजणीला जास्त वेळ लागणार आहे. प्रथमत: पोस्टल मतदारांनी केलेल्या मतदानाची मोजणी होईल. यानंतर ईव्हीएममध्ये बंदिस्त मतमोजणीस प्रारंभ होईल. त्यासाठी प्रत्येक विधानसभानिहाय १४ टेबल असणार आहेत. प्रत्येक टेबलावर उमेदवारांचा एक प्रतिनिधी असेल. प्रत्येक उमेदवाराला सहा विधानसभा मतदारसंघासाठी एकूण ८४ प्रतिनिधी नियुक्त करण्याची संधी होती. त्याप्रमाणे प्रतिनिधी कंट्रोल युनिटवरील आकड्यांकडे लक्ष ठेवणार आहेत.

त्यांना प्रशासनाकडून आयकार्ड वितरित करण्यात आले आहेत. २०१९ च्या निवडणुकीचा निकाल रात्री उशिरा जाहीर झाला होता. उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू राहिल्यामुळे उमेदवारांना मध्यरात्री प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिली. (latest marathi news)

Dindori Lok Sabha Election Result
Dindori Lok Sabha Constituency : शरद पवार की अजित पवारांना दिंडोरी देणार कौल?

सर्वप्रथम पोस्टलची मतमोजणी

सीमेवर असलेल्या जिल्ह्यातील सैनिकांनी ऑनलाइन पद्धतीने (ईटीपीबीएमएस) मतदान केले आहे. नाशिक लोकसभेसाठी एक हजार १८६, तर दिंडोरीत एक हजार ८६८ जवानांनी मतदान केले आहे. सकाळी आठपर्यंत प्राप्त होणारे मतदान ग्राह्य धरण्यात येणार आहे. तर शासकीय कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदानाची सुविधा देण्यात आली होती.

नाशिकमध्ये तीन हजार ७६ पोस्टल मतदार आहेत. तर दिंडोरीत तीन हजार १७३ पोस्टल मतदान झाले आहे. पोस्टल मतदान मोजणीसाठी लोकसभानिहाय प्रत्येकी दहा टेबल आहेत. अगोदर पोस्टल मतमोजणीस प्रारंभ होईल. त्याचवेळी मुख्य मतमोजणी म्हणजे कंट्रोल युनिटमधील मतमोजणी सुरू करण्यात येणार आहे. मुख्य मतमोजणी संपण्यापूर्वी पोस्टल मतदान पूर्ण मोजले जाणे आवश्‍यक राहणार आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय नियोजन

मतदारसंघ........एकूण मतदान केंद्र........टेबल........फेऱ्या.........मतदान

दिंडोरी लोकसभा

नांदगाव...................३३१.......................१४.............२४...........५८.२४ टक्के

कळवण-सुरगाणा....३४५.......................१४............२५............७०.८९ टक्के

चांदवड-देवळा..........२९६.......................१४............२२...........

६६.६५ टक्के

येवला.......................३२०.......................१४............२३............६५.३८ टक्के

निफाड.....................२७३........................१४............२०...........६४.३१ टक्के

दिंडोरी-पेठ..............३५७.......................१४.............२६..........७५.४२ टक्के

एकूण.......................१९२२..................८४...............००...........६६.७५ टक्के

Dindori Lok Sabha Election Result
Dindori Lok Sabha Constituency : दिंडोरी मतदारसंघात चारही वेळा मतदानात वाढ!

नाशिक लोकसभा

सिन्नर...................३२१.......................१४...............२३........६९.५० टक्के

नाशिक पूर्व.............३२६.......................१४...............२४.......५५.३८ टक्के

नाशिक मध्य...........२९५......................१४..............२२...........५७.१५ टक्के

नाशिक पश्‍चिम.......४१०.....................१४..............३०.............५४.३५ टक्के

देवळाली.................२६९......................१४...............२०............६२.०५ टक्के

त्र्यंबक-इगतपुरी......२८९......................१४..............२१.............७२.२४ टक्के

एकूण......................१९१०....................८४..............००.............६०.७५ टक्के

मतमोजणीची ठळक वैशिष्ट्ये

- उमेदवारांच्या प्रतिनिधींना मोबाईल, पेन किंवा इतर साहित्य घेऊन जाण्यास बंदी

- आयकार्डशिवाय कुठल्याही प्रतिनिधीला प्रवेश नाही

- मतमोजणी केंद्रावर सीसीटीव्ही, पोलिस बंदोबस्त

- उमेदवार प्रतिनिधींसमोर ‘स्ट्राँग रूम’चे सील उघडणार

- मतमोजणी करताना बॅलेट युनिटमध्ये तांत्रिक अडचण उदभवल्यास व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी

- प्रत्येक विधानसभेतील पाच व्हीव्हीपॅटमधील मतांची होणार मोजणी

- प्रत्येक लोकसभेसाठी ४८५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

- विधानसभानिहाय मतमोजणीसाठी १४ टेबल, एकूण ८४ टेबलांवर एकाच वेळी मतमोजणी

- एका फेरीसाठी सुमारे अर्धा तास लागणार

- एका फेरीत सुमारे ३५ ते ४० हजार मतांची मोजणी

- दुपारी बारापर्यंत मतदारांचा कौल लक्षात येणार

- फेरमतमोजणीसाठी ऐनवेळी निर्णय घेण्यात येईल

Dindori Lok Sabha Election Result
Dindori Constituency Lok Sabha Election Result : भास्कर भगरे ठरले जायंट किलर! भाजपच्या भारती पवार मोठ्या फरकाने पराभूत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.