Nashik Lok Sabha Election : राज्यात सर्वाधिक दिंडोरीसाठी मतदान; मतदारांचा 41 अंश सेल्सिअस तापमानातही उत्साह कायम

Lok Sabha Election : राज्यात पाचव्या टप्प्यासाठी १३ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (ता.२०) मतदान झाले.
nashik Lok Sabha Election
nashik Lok Sabha Electionesakal
Updated on

Nashik Lok Sabha Election : राज्यात पाचव्या टप्प्यासाठी १३ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (ता.२०) मतदान झाले. सकाळच्या सत्रात मतदान केंद्रांवर मतदारांचा उत्साह दिसून आला. अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. दुपारपर्यंत झालेल्या मतदानात राज्यात दिंडोरी लोकसभा मतदारसंघाने आघाडी घेतली होती. दुपारी ३ वाजेपर्यंत दिंडोरीत ४५.९६ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. ( Highest polling for Dindori in state )

मतदानाची ही टक्केवारी राज्यात सर्वाधिक ठरली. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी देशात ४९ जागांवर यात महाराष्ट्रातील १३ जागांवर सोमवारी सकाळी ७ वाजेपासून मतदान सुरू झाले. या निवडणुकीनिमित्ताने अनेक दिग्गज नेत्यांसह राजकीय पक्षांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. सकाळच्या सत्रात मोठ्या संख्येने मतदारांनी घराबाहेर पडत मतदानाचा हक्क बजाविला.

दुपारी उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्रामीण भागात सकाळी मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावत मतदान केले. सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात अवघे १५.९३ टक्के मतदान झाले. यात सर्वात जास्त मतदान हे दिंडोरी मतदारसंघात १९.५० टक्के मतदान झाले. साधारणत: दुपारी उन्हाचा पारा वाढलेला असताना ग्रामीण भागात मतदार घराबाहेर पडत नसल्याने मतदान केंद्रांवर शुकशुकाट असल्याचा अनुभव आहे.

मात्र, यंदा ग्रामीण भागात उलटे चित्र दिसले. ११ वाजेनंतर, तापमानाचा पारा वाढूनही ग्रामीण भागात मतदारांचा उत्साह कायम होता. भर दुपारी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसत होती. दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात सरासरी २७.७८ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. यातही सर्वाधिक मतदान दिंडोरीत ३३.२५ टक्के मतदान झाले आहे. सोमवारी जिल्ह्याचे तापमान ४०.५ अंश सेल्सिअस होते. (latest marathi news)

nashik Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election : पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त! काही ठिकाणी मोबाईलमुळे प्रवेश नाकारला

पारा वाढलेला असला तरी, दुपारी एका वाजेनंतरही दिंडोरीतील अनेक दुर्गम आणि ग्रामीण भागात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कळवण, सुरगाणा असो की, दुष्काळी नांदगाव तालुका या तालुक्यांमधील मतदान केंद्रावर मतदारांच्या भर उन्हामध्ये मतदार उत्साहात मतदानाचा हक्क बजावीत होते.

दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३८.७७ टक्के मतदान झाले तर, यात दिंडोरीत ४५.९६ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. मतदानाचा उत्साह सायंकाळपर्यंत कायम असल्याचे दिसून आले. यात कळवण-सुरगाणा मतदारसंघात सर्वाधिक ५४ टक्के मतदान झाले.

मतदारसंघातील विधानसभानिहाय मतदान टक्केवारी

विधानसभा मतदारसंघ ११ वाजेपर्यंत १ वाजेपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत

नांदगाव १८.६८ ३२.०४ ४१.८८

कळवण १९.२५ ३५.४५ ५३.८५

चांदवड २०.८८ ३५.०५ ४७.५७

येवला २०.०२ ३२.०८ ४०.६७

निफाड २०.०१ ३१.६१ ४४.३७

दिंडोरी १८.०९ ३३.०१ ४८.०२

nashik Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिकमध्ये 61 टक्के, तर दिंडोरीत 63 टक्के मतदारांनी बजावला हक्क

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.