Nashik Lok Sabha Election : महाविकास आघाडीतर्फे राजाभाऊ वाजेच; नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवाराला टक्कर

Lok Sabha Election : महाविकास आघाडीच्या वतीने नाशिक लोकसभा मतदारसंघातून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी बुधवारी (ता. २७) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली.
MLA Rajabhau Waje
MLA Rajabhau Wajeesakal
Updated on

Nashik Lok Sabha Election : महाविकास आघाडीच्या वतीने नाशिक लोकसभा मतदारसंघातून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी बुधवारी (ता. २७) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. राज्यात १६ जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली. त्यात नाशिकच्या जागेचा समावेश आहे. वाजे यांच्या नावाची घोषणा होताच शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला. (Nashik Lok Sabha Election Mahayuti candidate clash in Nashik marathi news)

शिवसेना भवन येथे शक्तिप्रदर्शन करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शक्तिप्रदर्शनावेळी माजी जिल्हाप्रमुख व शिवसेनेकडून इच्छुक असलेले विजय करंजकर, तसेच देवळालीचे माजी आमदार योगेश घोलप अनुपस्थित राहिल्याने आगामी काळात शिवसेनेला बंडखोरीचा सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या ‘उबाठा’ गटाकडून विजय करंजकर इच्छुक होते; परंतु ऐनवेळी वाजे यांचे नाव उमेदवारांच्या यादीत आल्याने करंजकर यांना मोठा धक्का मानला जात आहे. माजी आमदार वाजेंनी सिन्नर मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. राजाभाऊ वाजे यांचे आजोबा शंकर वाजे हे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार होते. त्यांच्या आजी रुक्मिणीबाई वाजे १९६७ मध्ये सिन्नरच्या पहिल्या महिला आमदार होत्या. (latest marathi news)

MLA Rajabhau Waje
Nashik Lok Sabha Election : नाशिकमधून राज किंवा अमित; मनसे पदाधिकाऱ्यांचे पत्रातून आवतण

दरम्यान, वाजे यांच्या उमेदवारीची घोषणा होताच शिवसेनेच्या कार्यालयात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या वेळी वाजे यांचा सत्कार करण्यात आला. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजाभाऊ वाजे हे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गुरुवारी (ता. २८) भेट घेणार आहेत. गुरुवारी दुपारी तीनला इगतपुरी येथील घाटनदेवी येथून मुंबईच्या दिशेने रॅली काढली जाणार आहे. या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

करंजकरांची नाराजी दूर करू

पक्षात निष्ठेने काम केल्याने उमेदवारी जाहीर करण्यात आली. महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या सहकार्याने निवडणूक लढवू आणि जिंकू. शिवसेनेत दहा वर्ष निष्ठेने काम केल्याचे फळ आहे, असे सांगत वाजे यांनी उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या विजय करंजकर यांची भेट घेणार असून, त्यांची नाराजी दूर करू, अशी प्रतिक्रिया राजाभाऊ वाजे यांनी दिली.

MLA Rajabhau Waje
Nashik Lok Sabha Election : नाशिक लोकसभा उबाठा गटाची उमेदवारी राजाभाऊ वाजे यांना जाहीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.