Nashik Lok Sabha Election :नाशिकमधील राजकारण तापले, ही गावे ठरविणार भावी खासदार

Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिक शहरातील साडेतीन विधानसभा मतदार प्रभावी तर ठरणार आहे त्याचबरोबर मतदान फिरविण्याची क्षमता असलेले महसुली मंडलदेखील महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 esakal
Updated on

Nashik Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिक शहरातील साडेतीन विधानसभा मतदार प्रभावी तर ठरणार आहे त्याचबरोबर मतदान फिरविण्याची क्षमता असलेले महसुली मंडलदेखील महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिक मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला असला तरी महायुतीकडून अद्याप उमेदवारी जाहीर झाली नाही. (Nashik Lok Sabha Election Nashik MP will decide villages marathi news)

परंतु नाशिकमधील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ यांचे नाव आल्यानंतर राजकारणात अधिक रंगत चढली आहे. शिवसेनेने पारंपरिक जागा आमच्याकडेच असल्याने शिवसेना जागा लढविणार, असा दावा केला आहे. एकीकडे राजकारण रंग असताना दुसरीकडे मतदानावर प्रभाव पडणारे गावेदेखील मतदानाच्या तयारीला लागले आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये नाशिक पूर्वस नाशिक पश्चिम, नाशिक मध्य या तीन संपूर्ण शहरी मतदारसंघांचा समावेश होतो. त्याचबरोबर देवळाली या विधानसभा मतदारसंघातील अर्धा भाग नाशिक महापालिकेत समाविष्ट असल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघात शहरातील साडेतीन मतदारांचा प्रभाव अधिक दिसून येतो.  (latest marathi news)

Lok Sabha Election 2024
Nashik Lok Sabha Election : नाशिक मतदारसंघात मराठा क्रांती मोर्चा लढणार; बैठकीत एकमताने निर्णय

सिन्नर व इगतपुरी या ग्रामीण मतदारसंघापेक्षा शहरी भागातील मतदान अधिक प्रभावी ठरते. मात्र असे असले तरी नाशिक लोकसभा मतदारसंघातील महसुली मंडळातील काही गावेदेखील महत्त्वाची भूमिका मतदारसंघामध्ये बजावतात. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसह महायुती व निवडणुकीच्या मैदानातील उमेदवारांचे या गावांकडे अधिक लक्ष राहणार आहे.

या गावांमधील मतदान ठरणार प्रभावी

नाशिक लोकसभा मतदारसंघात पूर्व, मध्य, पश्चिम व देवळाली या मतदारसंघांसह सिन्नर, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमधील गावांचा समावेश होतो. इगतपुरी तालुक्यातील घोटी, टाकेद या महसुली मंडलातील गावे अधिक प्रभावी आहे. त्याचबरोबर नाशिक तालुक्यातील गिरणारे, मखमलाबाद, सातपूर, माडसांगवी, शिंदे, देवळाली, भगूर या मंडल कार्यक्षेत्रातील गावे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

Lok Sabha Election 2024
Nashik Lok Sabha Election : भाजपच्या धक्का तंत्राने शिंदे गटाला झटका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.