Nashik Lok Sabha Election : पिंपळगावकरांनी तीव्र उन्हातही बजावला हक्क; सकाळपासूनच लागल्या होत्या रांगा

Lok Sabha Election : उन्हाचा चटका तरी कार्यकर्त्यांची मतदारांचे मतदान करून घेण्यासाठी सुरू असलेली धडपड.
Crowd of citizens to find name in the list.
Crowd of citizens to find name in the list.esakal
Updated on

Nashik Lok Sabha Election : उन्हाचा चटका तरी कार्यकर्त्यांची मतदारांचे मतदान करून घेण्यासाठी सुरू असलेली धडपड. त्यामुळे पिंपळगाव बसवंत शहरासह परिसरात मतदार रांगा लावून मतदान करीत असल्याचे चित्र दिसून आले. रंगदार अन् काट्याच्या झालेल्या निवडणुकीमुळे कार्यककर्त्यांनी एकेक मत मिळविण्यासाठी सुरू असलेली धावपळ भर उन्हात दिसून आली. सकाळीपासून मतदान केंद्रांवर लागलेल्या रांगा तीव्र उन्हातही कायम राहिल्या. ( People of Pimpalgaon exercised their right even in summer heat )

राजकीय पंढरी असलेल्या पिंपळगावमध्ये राजकीय नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला. महायुतीच्या उमेदवार डॉ.भारती पवार व महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी पिंपळगावच्या मतदान केंद्रांना भेटी दिल्या. मतदारांना उन्हापासून बचावासाठी मतदान केंद्राबाहेर मंडप उभारण्यात आले होते. कडक उन्हातही घामाच्या धारा झेलत मतदानाचा वेग कायम राहिला. दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांकडून भर उन्हातही मतदारांना केंद्रापर्यंत आणण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे सायंकाळी चारनंतर मतदानाने अधिक वेग घेतला. (latest marathi news)

Crowd of citizens to find name in the list.
Nashik Lok Sabha Election : मतदानाचा हक्क बजावताच सोशल मीडियावर पोस्ट

मतदार यादीत नावाचा शोध घेण्यासाठी बुथवर गर्दी होती. विशेष म्हणजे वयस्कर आजी-आजोबांनी मतदान केंद्रांवर जाऊन आपला हक्क बजावला. प्रथमच मतदान केलेले युवक सेल्फी काढताना दिसत होते. नवमतदारांचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. दिव्यांग व्यक्तींनीही मतदानाचा हक्क बजावून आम्हीही मतदार आहोत, असे कृतीतून दाखवले. मतदारांना प्रोत्साहीत करण्यासाठी मतदान केंद्रांची आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आली.

सोशल मिडिया निवडणूकमय...

लोकसभा निवडणुकीत मतदानात अभुतपूर्व उत्साह दिसून आला. मतदान केंद्रावर मोठ्या उत्साहाने आलेल्या तरूणांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मतदान केल्यानंतर तरूणांनी त्यांचे सेल्फी, फोटो आणि व्हिडीओ फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉटसॲपवर शेअर केले. त्यामुळे सोशल साईटवर मतदानानंतर जास्तीतजास्त फोटो शेअर करण्याची जणू स्पर्धाच लागली होती. निवडणुकीमुळे सोशल मिडीयाचे तापलेले वातावरण आज मतदानाच्या पोस्ट झाल्यानंतर काहीसे निवळलेले दिसले.

Crowd of citizens to find name in the list.
Nashik Lok Sabha Election : जळगावकरांच्या हाती दिंडोरीचे स्टिअरिंग; संकटमोचक गिरीश महाजनांचा मतदारसंघात तळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.