Lok Sabha Voting Reels Cyber Crime : मतदान केंद्रातील रिल्स भोवणार! सायबर पोलिसांकडून शोध सुरू

Nashik Cyber Crime : शहरात याप्रकरणी एक गुन्हा दाखल झाला असला तरी शहर व ग्रामीणमध्ये अनेकांनी असे प्रकार केलेले असून, याची गंभीर दखल सायबर पोलिसांनी घेतली आहे
Lok Sabha Voting Reels Cyber Crime
Lok Sabha Voting Reels Cyber Crimeesakal
Updated on

नाशिक : लोकसभा निवडणुकीमध्ये अनेकांनी मतदान करताना आपल्या मोबाईलमध्ये रिल्स तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. त्याचीच पुनरावृत्ती नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या मतदान प्रक्रियेदरम्यान घडली आहे. शहरात याप्रकरणी एक गुन्हा दाखल झाला असला तरी शहर व ग्रामीणमध्ये अनेकांनी असे प्रकार केलेले असून, याची गंभीर दखल सायबर पोलिसांनी घेतली आहे. त्यामुळे ज्यांनी मतदान केंद्रात मतदान करतानाच्या रिल्स सोशल मीडियावर अपलोड केल्या आहेत, त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. (Nashik Lok Sabha polling Voting Reels cyber crime)

लोकसभा निवडणुकीत देशात अनेक ठिकाणी मतदान करतानाचे मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून त्याचे रिल्स करून सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. त्याप्रमाणेच, पंचवटीतील एका तरुण मतदाराने सीडीओ मेरी शाळेतील मतदान केंद्रात मतदान करीत असताना इव्हीएम मशिनशेजारी कांदा ठेवून मोबाईलमध्ये व्हिडिओ शुटिंग केली.

याप्रकरणी संशयित अथर्व खांदवे याच्याविरोधात पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, याचप्रमाणे, अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनीही इव्हिएम मशिनच्या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला होता. त्याचा व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. (latest marathi news)

Lok Sabha Voting Reels Cyber Crime
Nashik Cyber Crime : OLX वरून सामान विक्री करणे दोघांना भोवले; सायबर भामट्यांनी तब्बल 10 लाखांना घातला गंडा

याचप्रमाणे, शहर-जिल्ह्यात काही हौशानवश्यांनीही मतदान करताना असे प्रकार केलेले आहे. मूळात मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आलेली होती. तरीही काहींनी कांदा ठेवून मतदान, टोमॅटो ठेवून मतदान करण्यासह नियमित मतदानाचेही व्हिडिओ नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात व्हायरल केले आहेत.

काही युजर्सने त्यासंदर्भात इन्स्टाग्रामवर ‘स्टोरी’ अपलोड केल्या आहेत. यामुळे नाशिक शहर व ग्रामीण सायबर पोलीस सतर्क झाले असून, या रिल्स बहाद्दर मतदारांचा शोध घेत आहे. यांच्याविरोधात मतदान केंद्रातील गैरवर्तन आणि नियमभंगाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

Lok Sabha Voting Reels Cyber Crime
Cyber Crime : सायबर चोरट्यांचा धुमाकूळ! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ६४ कोटींची फसवणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.