Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी तरुणांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. मतदानासाठी मतदान केंद्रांवर तरुणांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मतदान केल्यानंतर तरुणांनी त्यांचे सेल्फी, फोटो आणि व्हिडिओ फेसबुक, इन्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर शेअर केले. त्यामुळे सोशल साईट्सवर मतदानानंतर जास्तीतजास्त फोटो टाकण्याची जणू स्पर्धाच लागली होती. ( Post on social media as soon as right to vote is exercised )
फेसबुकच्या माध्यमातून मतदार जागृतीसाठी तरुणांनी खूप प्रयत्न केले. मतदानानंतर टाकण्यात आलेल्या पोस्टच्या माध्यमातून तरुणांनी नागरिकांना जास्तीतजास्त मतदान करण्याचे आवाहनही केले. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासूनच सोशल मीडियावर वातावरण तापले होते. विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांनीही सोशल मीडियाचा प्रचारासाठी प्रभावी वापर केला. त्याचबरोबर निवडणूक आयोगानेही मतदान जनजागृती केली.
मतदानाच्या दिवशीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. उमेदवारांपासून ते तरुण मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आणि सोशल मीडियावर फोटो शेअर केले. मतदान केंद्रावरील पोलिसांनी मतदारांना मोबाईल फोन घेऊन जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला असला तरी बहुतांश मतदारांनी मोबाईल फोन घेऊन आत जाऊन त्यांचे फोटो क्लिक करून ते फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर शेअर केले. तसेच, व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर स्टेटस पोस्ट केले. (latest marathi news)
निवडणूक आयोगासह अनेक संस्थांनी आपला मताधिकार वापरताना सेल्फी काढण्यासाठी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. जिल्हा प्रशासनानेही मतदार जागृतीसाठी मोहीम राबवली. जिल्ह्यातील अनेक व्यापारी संघटनांच्या वतीने मतदारांना जागरूक करण्यासाठी मोहीम राबवत असताना त्यांनी मतदानाचा हक्क बजावणाऱ्या ग्राहकांना खरेदीवर सवलत जाहीर केली आहे. जनजागृती मोहिमेचा परिणामही दिसून आला. विशेषतः महिला आणि तरुणाई आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी खूप उत्साही दिसत होती.
मतदान केंद्राबाहेर सेल्फी पॉइंट
लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. यंदाच्या निवडणुकीत युवा मतदारांची संख्या लक्षणीय आहे. ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर खास करून युवकांसाठी मतदान केल्यानंतर सेल्फी पॉइंट करण्यात आला आहे. व्हीव्हीपॅटसह सेल्फी अन् हायटेक यंत्रणेमुळे यंदाच्या निवडणुकीचे वेगळेपण आहे. जिल्हा निवडणूक स्वीप उपक्रमांतर्गत वोटर सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले. युवकांना सेल्फीचे आकर्षणही असल्याने सोशल मीडियावर आपण काय करतो, याचे अपडेट टाकण्याची जणू स्पर्धाच चालली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.