Nashik Lok Sabha Election : नाशिक, दिंडोरीत ‘तोफा’ धडाडणार; पंतप्रधानांची सभा 17 ला?

Lok Sabha Election : नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदार संघांतील उमेदवारांचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे.
Nashik Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election esakal
Updated on

Nashik Lok Sabha Election : नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदार संघांतील उमेदवारांचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. दोन आठवड्यांनी २० तारखेला मतदान होणार असल्याने या दोन आठवड्यांमध्ये आता उमेदवारांच्या प्रचारासाठी ‘स्टार’ नेत्यांच्या सभा होत आहेत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १० तारखेला होणारी सभा काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली असून ही सभा १७ मे रोजी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ()

परंतु अद्याप त्यास प्रशासनाकडून दुजोरा मिळू शकलेला नाही. दरम्यान, पोलिसांकडून सभा आणि त्यानंतर मतदान प्रक्रिया यासंदर्भातील कडेकोट पोलिस बंदोबस्ताचे नियोजन केले जात आहे. नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी येत्या २० मे रोजी मतदान होते आहे. राज्यात तिसर्या टप्प्यातील मतदान मंगळवारी (ता.७) होते आहे.

तर चौथ्या टप्प्यातील मतदान १३ तारखेला होणार असून, यात उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, जळगाव जिल्ह्यांतील मतदारसंघांचा समावेश आहे. त्यानंतर नाशिक, दिंडोरी, धुळे, नंदूरबार येथे २० ला मतदान होणार आहे. यासाठी दोन आठवड्यांचा अवधी असल्याने या काळात शहर-जिल्ह्यात प्रचारांच्या अक्षरश: तोफा धडाडणार आहेत.

महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह स्टार नेत्यांच्या सभा शहर - जिल्ह्यात होऊ घातल्या आहेत. त्यासंदर्भात नियोजन पक्ष पातळीवर सुरू आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शरद पवार, उध्दव ठाकरे यांच्या सभा होणार आहेत. याशिवाय, राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्याही सभा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (latest marathi news)

Nashik Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election : तिढा अजूनही कायम.... पण शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिकमध्ये घेतले अर्ज

यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, काँग्रेसचे राहुल गांधी, प्रियंका गांधी, पृथ्वीराज चव्हाण यांच्या सभा होण्याची शक्यता आहे. प्रचारासाठी नेत्यांच्या सभा होणार असल्याने या काळात कोणताही अनुचित प्रकार वा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्‌भवू नये यासाठी पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर-पाटील यांच्यासह नाशिक ग्रामीणचे अधिकार्यांकडून बंदोबस्ताचे नियोजन केले जात आहेत.

तसेच, शहरातील सभांसंदर्भात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व अधिकारी बंदोबस्ताचे नियोजन करीत आहेत. मतदान केंद्रांवरील बंदोबस्ताच्या नियोजनासह महत्त्वाच्या व्यक्तिंचे दौरे व सभा स्थळांच्या सुरक्षेचे नियोजन पोलिसांकडून केले जात आहे. सभास्थळांची पाहणी करून नियोजनाचा वारंवार आढावा घेण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांची सभा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत होणार असली, तरी शहरातून अतिरिक्त बंदोबस्त दिला जाणार आहे. तसेच राज्यभरातून साडेतीन हजार पोलिस मतदान प्रक्रियेकरीता अतिरिक्त कुमक म्हणून मागविण्यात येणार आहेत.

परजिल्ह्यात बंदोबस्ताला

शेजारील अहमदनगर जिल्ह्यात १३ तारखेला मतदान होते आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी हे उद्या (ता.७) अहमदनगरमध्ये प्रचार सभा घेत आहेत. याठिकाणी बंदोबस्तासाठी शहर आयुक्तालयातून जादा पोलिस बंदोबस्त पाठविण्यात आला असून, यात गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव व आयुक्तालयातील पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्यासह परजिल्ह्यातून आणि विविध विभागातील पोलीस अधिकारी-कर्मचार्यांना जादा बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले आहे.

Nashik Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election : पोलिस सतर्क; मतदान केंद्रांची पाहणी सुरक्षात्मक उपाययोजनांचा आढावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.