Nashik Lok Sabha Election Result : नाशिकच्या खासदाराची माळ कोणाच्या गळ्यात?

Lok Sabha Election Result : मतांची समीकरणे वेगवेगळ्या प्रकारे मांडून मीच विजयी होणार, असा दावा महायुती आणि महाविकास आघाडीच्या तसेच अपक्ष उमेदवारांकडून केला जात आहे.
Shantigiri Maharaj, Hemant Godse, Rajabhau Waje
Shantigiri Maharaj, Hemant Godse, Rajabhau Wajeesakal
Updated on

सिन्नर : नाशिक लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठीची मतमोजणी मंगळवारी (दि.४) होणार आहे. मोजणीचा दिवस जवळ येत असताना कोण बाजी मारणार व नाशिकचा खासदाराची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याविषयी उत्सुकता ताणली गेली आहे. मतांची समीकरणे वेगवेगळ्या प्रकारे मांडून मीच विजयी होणार, असा दावा महायुती आणि महाविकास आघाडीच्या तसेच अपक्ष उमेदवारांकडून केला जात आहे. (Nashik Lok Sabha Election Result)

दरम्यान, महायुती आणि महाविकास आघाडीकडून अत्यंत प्रतिष्ठेच्या करण्यात आलेल्या या लढतीकडे संपूर्णच्या राज्याचे लक्ष लागून आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान झाले. नाशिक लोकसभेसाठी ६०.७५ तर यामध्ये नाशिक लोकसभेतील २० लाख ३० हजार १२४ मतदानापैकी १२ लाख ३३ हजार ३८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

त्यात ६ लाख ७२ हजार ५७५ पुरुष तर ५ लाख ६० हजार ७७० महिलांनी मतदान केले. तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघातील विधानसभानिहाय मतदानाच्या टक्केवारीचा विचार केल्यास सिन्नर विधानसभा मतदारसंघात ६९.५० टक्के मतदान झाले असून येथील एकूण ३ लाख ६ हजार ५३३ मतदारांपैकी २ लाख १३ हजार ४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

तर इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात ७२.२४ टक्के इतके मतदान झाले असून या मतदारसंघातील एकूण २ लाख ७४ हजार ५४ मतदारांपैकी १ लाख ९७ हजार ९७५ मतदारांनी मतदान केले आहे. त्याबरोबरच नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी ५४.३५ टक्के मतदान झाले असून येथील एकूण ४ लाख ५६ हजार ९६ मतदारांपैकी २ लाख ४७ हजार ८९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. (latest marathi news)

Shantigiri Maharaj, Hemant Godse, Rajabhau Waje
Nashik Lok Sabha Election Result : नाशिकमध्ये धनुष्य चालणार की मशाल पेटणार!

तसेच नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात ५५.३८ टक्के इतके मतदान झाले असून या मतदारसंघातील एकूण ३ लाख ८८ हजार ४८५ मतदारांपैकी २ लाख १५ हजार १५२ मतदारांनी मतदान केले आहे. याशिवाय नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात ५७.१५ टक्के मतदान झाले असून येथील एकूण ३ लाख २८ हजार ५४ मतदारांपैकी १ लाख ८७ हजार ४९१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

तर देवळाली विधानसभा मतदारसंघात ६२.०५ टक्के इतके मतदान झाले असून या मतदारसंघातील एकूण २ लाख ७६ हजार ९०२ मतदारांपैकी १ लाख ७१ हजार ८२४ मतदारांनी मतदान केले आहे. यावरून कोणाच्या गळ्यात खासदारकीची माळ पडते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. मतमोजणी मंगळवारी होणार असल्यामुळे कोण बाजी मारणार, नाशिकचा नवा शिलेदार कोण असेल, याची मतदारांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

त्यावरून दावे प्रतिदावे केले जात आहेत. चौकाचौकात, हॉटेलमध्ये, पारावर चर्चा झडत आहेत. विधानसभानिहाय मतांची आकडेवारीची मोडतोड करून गणिते मांडली जात आहेत. त्यात माझाच विजय होणार, असा दावा महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून केला जात आहे. दरम्यान, काही उत्साही कार्यकर्ते व समर्थकांनी आपल्या उमेदवाराच्या विजयाचे फ्लेक्स लावून अभिनंदनही केले आहे. तसेच उमेदवारांच्या समर्थकांनी देवदर्शन घेत विजयासाठी साकडे घातले आहे.

Shantigiri Maharaj, Hemant Godse, Rajabhau Waje
Nashik Lok Sabha Election : निवडणुकीचा ‘लाइव्ह’ निकाल बघा आज सिनेमागृहात!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.