Nashik Lok Sabha Constituency : एकाला हॅट्‌ट्रीकचे वेध, दुसऱ्याकडून कार्यालयाचा शोध; भावी खासदारांची तयारी

Lok Sabha Constituency : दिंडोरी व नाशिकचा आगामी खासदार कोण याचा निकाल तीन दिवसानंतर लागेल.
Rajabhau Waje, Hemant Godse
Rajabhau Waje, Hemant Godse esakal
Updated on

Nashik Lok Sabha Constituency : दिंडोरी व नाशिकचा आगामी खासदार कोण याचा निकाल तीन दिवसानंतर लागेल. परंतू नाशिकच्या दोन्ही प्रमुख पक्षाच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना आपणच खासदार होऊ असा ठाम विश्‍वास असून त्यातून निकालाच्या दिवसाची तयारी सुरु आहे. विद्यमान खासदारांना हॅट्‌ट्रीकचे वेध लागले असून निकाल लागल्यानंतर ‘नाशिक मध्ये इतिहास घडला’ या आशयाचे १३० होर्डींग्ज सहा विधानसभा मतदारसंघात लावले जाणार आहेत. ( result of who will be next MP of Dindori and Nashik will be announced )

तर दुसऱ्या भावी खासदाराला नाशिकपासून दुरावा नको म्हणून आत्तापासूनच शरणपूर, देवळाली व नाशिकरोड भागात कार्यालयाचा शोध घेण्यात आला. लोकसभेच्या नाशिक व दिंडोरी मतदारसंघामध्ये २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालेल्या जनमताचा कौल चार जून रोजी खुला होणार आहे. यापूर्वी नाशिक लोकसभा मतदारसंघांमधील दोन भावी खासदारांकडून तयारी सुरू झाली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक अटीतटीची झाली. महाविकास आघाडीचा उमेदवार जवळपास दीड महिना अगोदर जाहीर झाला. त्यामुळे तळागाळापर्यंत प्रचार करण्याची मोठी संधी त्यांना मिळाली. त्यामानाने महायुतीच्या उमेदवाराला फारसा कालावधी मिळाला नाही. प्रत्यक्षात मतदानाच्या १५ दिवस अगोदर दोन्ही उमेदवारांनी प्रचारासाठी जोर लावला. प्रचार अगदी टोकाला पोहोचला. (latest political news)

Rajabhau Waje, Hemant Godse
Nashik Lok Sabha Constituency : स्थानिक मुद्यांवर रोष कायम; मताधिक्याबाबत उत्सुकता

त्यातून आपणच नाशिक लोकसभा मतदारसंघाचे भाविक खासदार राहू असा विश्वास महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांना आहे. वास्तविक मतमोजणीनंतर जो निकाल लागायचा तो लागेलच, त्यानंतर देखील विजयाचा जल्लोष किंवा पुढील तयारी करता येते. मात्र विजयाचा आत्मविश्वास इतका उंचावला की, मतदान लागण्यापूर्वीच दोन्ही उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे.

विजयाची महत्वाकांक्षा टोकाला

नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये दोन ग्रामीण विधानसभेचे मतदार संघ आहेत तर चार शहरी भागातील आहेत. महाविकास आघाडीचा उमेदवार ग्रामीण भागातील असल्याने शहराशी संपर्क राहणार नाही असा प्रचार झाला. त्यामुळे निवडून आल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच नाशिक शहरातील मतदारांना भेटण्यासाठी कार्यालयाचा शोध घेण्यात आला आहे.

दुसरीकडे महायुतीच्या उमेदवाराला आपणच हॅट्‌ट्रिक मारणार असा ठाम विश्वास आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेचच सहा विधानसभा मतदारसंघात ‘नाशिकने हॅट्‌ट्रिकचा इतिहास घडविला’ या आशयाचे होर्डिंग्ज लावण्याची तयारी केली असून त्याचे कॉन्ट्रॅक्ट देखील दिल्याने मतमोजणीपूर्वीदेखील नाशिक लोकसभा मतदारसंघ चर्चेत राहिला आहे.

Rajabhau Waje, Hemant Godse
Nashik Lok Sabha Constituency : दावे-प्रतिदावे, पैजा अन्‌ वादविवादात विजयाचा दावा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.