Nashik Lok Sabha Election : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

Lok Sabha Election : महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचाराला कमी कालावधी राहिल्याने महायुतीच्या नेत्यांची फौज नाशिकच्या मैदानात उतरली.
nashik Lok Sabha Election
nashik Lok Sabha Electionesakal
Updated on

Nashik News : महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचारात रंगत आली. तोपर्यंत महाविकास आघाडीचा प्रचाराचा घोडा एकतर्फी दौडत होता. महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचाराला कमी कालावधी राहिल्याने महायुतीच्या नेत्यांची फौज नाशिकच्या मैदानात उतरली. जळगाव लोकसभेची निवडणूक आटोपल्यानंतर ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला. (Nashik Lok Sabha Election)

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले. मुख्यमंत्री शिंदे तब्बल तीनदा नाशिकमध्ये आले. यात एकदा त्यांनी रोड शो घेतला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भागवत कराड, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे.

उद्योगमंत्री उदय सामंत, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महायुतीकडून मतदारसंघामध्ये आले. त्यांच्या सभा आकर्षक ठरल्या. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी मैदान लढविले. त्यांची एक जाहीर सभा झाली. (latest marathi news)

nashik Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election : मतदान केंद्रात मोबाईलसह कोणतीही वस्तू नेण्यास मज्जाव

त्याव्यतिरिक्त प्रवक्ते संजय राऊत, युवा नेते आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे यांच्या सभा झाल्या. दिंडोरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा आकर्षक ठरली. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, कराळे मास्तर यांनी किल्ला लढविला.

विकास अन् गद्दारी

महायुतीकडून राम मंदिर, देशाचा विकास व नाशिकचा विकास हे मुद्दे अधिक चर्चेला आले, तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे दोन पक्ष झाल्याने ‘गद्दार’ व ‘निष्ठा’ या दोन मुद्द्यांना महत्त्व आले.

nashik Lok Sabha Election
Nashik City Transport : बत्ती गुलमुळे सिग्नल यंत्रणा बंद! शहरात वाहतुक कोंडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.