Nashik Lok Sabha Election : मतदान केंद्रावर सेक्टर अधिकार्यांचा असेल ‘वॉच’; शहर विशेष शाखेचे नियोजन

Lok Sabha Election : नाशिक लोकसभा मतदारसंघात येत्या २० तारखेला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेसह जिल्हा प्रशासनही सज्ज झाले आहे.
Nashik Lok Sabha Election 2024
Nashik Lok Sabha Election 2024esakal
Updated on

Nashik Lok Sabha Election : नाशिक लोकसभा मतदारसंघात येत्या २० तारखेला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेसह जिल्हा प्रशासनही सज्ज झाले आहे. मतदार संघात नेमण्यात आलेल्या सेक्टर अधिकार्यांमध्ये पोलीस अधिकार्यांचीही नेमणूक करण्यात आली असून, त्या अधिकार्याच्या सेक्टरमधील मतदार केंद्रांवर त्यांची करडी नजर राहणार आहे. तसे आदेशच विशेष शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिले आहेत. ( Sector Officers will be on Watch at Polling Station )

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या २० तारखेला होत असून, नाशिक लोकसभा मतदारसंघाचा यात समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनासह पोलिस यंत्रणाही सज्ज झाली आहे. मतदानाची प्रक्रिया कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांच्या आदेशान्वये सेक्टर अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

यामध्ये महसूल, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, दूग्ध विकास, महापालिका, आदिवासी विकास, आयकर, मेरी यासह अन्य शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. दरम्यान, शहर पोलीस आयुक्तालयाकडूनही या सेक्टर अधिकार्यांमध्ये पोलीस अधिकारी व अंमलदारांची नियुक्ती केली आहे.

विशेष शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या आदेशान्वये विशेष शाखेने १३ पोलिस ठाण्यातील अंमलदारांची विविध सेक्टरमध्ये नियुक्ती केली असून, त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. मतदानाच्या आदल्या दिवसापासून मतदान केंद्रांवर सेक्टर पोलीस अधिकाऱ्याची करडी नजर असणार आहे. (latest marathi news)

Nashik Lok Sabha Election 2024
Nashik Lok Sabha Election : गोडसे, वाजे, भगरेंना ‘सोशल’ प्रचार थांबविण्याची नोटीस!

मतदारसंघ : सेक्टर पोलीस अधिकारी

नाशिक पूर्व : ३२

नाशिक मध्य : ३०

नाशिक पश्चिम : २६

देवळाली कॅम्प : १९

एकूण : १०७

मतदारसंघ : मतदान केंद्र

नाशिक पूर्व : ३२६

नाशिक मध्य : २९५

नाशिक पश्चिम : ४१०

देवळाली कॅम्प : २६९

Nashik Lok Sabha Election 2024
Nashik Lok Sabha Election : चर्चा नाराजीची मात्र निवडणूकीचा माहोल फिफ्टी-फिफ्टीचा!

सेक्टर अधिकार्यांची गस्त

- आयुक्तालय हद्दीत १२२७ मतदान केंद्र

- आयुक्तालयकडून १०७ सेक्टर अधिकाऱ्याची नियुक्ती

- सेक्टर अधिकार्यांवर मतदान केंद्रांची जबाबदारी निश्चित

- मतदान केंद्राबाहेरील गर्दीवर नियंत्रण ठेवणे

- मतदान केंद्रावर दक्षता बाळगणे

- मतदान केंद्रांवर सातत्याने गस्त

- गस्तीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्याचे स्वतंत्र पथक

''मतदान केंद्रावरील अनुचित घडणार रोखण्यासाठी सेक्टरनिहाय पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व निर्विघ्न पार पडावी याची प्रामुख्याने या अधिकाऱ्यावर जबाबदारी राहील.''- प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा.

Nashik Lok Sabha Election 2024
Nashik Lok Sabha Election : 62 मतदान केंद्रांची ‘वायरलेस’वर भिस्त; मोबाईल नेटवर्क कमी पडल्याने उपाययोजना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.