Nashik Lok Sabha Election : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीचा उत्सव होत असताना निवडणूक आयोगाला विविध अधिकारी-कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. यावेळी विविध विभागातील सेवकांना नियुक्त केले जात असताना विविध प्रशिक्षण शिबिरेही आयोजित केली जातात. पण, अशातच त्या राष्ट्रीय कार्यातून बाजूला होण्यासाठी विविध कारणे दिली जात असताना येवला येथील तुषार शेळके व सोनाली कदम-शेळके यांनी मात्र लहान मुलगा श्रीअंश अन् मुलगी सान्वी यांना आईकडे ठेवत मोठ्या आनंदाने या राष्ट्रीय कार्यात सहभाग घेतला आहे. ( shelke couple in election celebration )
निवडणूक ड्युटी रद्द करण्यासाठी सरकारी कर्मचारी विविध कारणे शोधत असतात. नाशिक जिल्ह्यात अनेक कर्मचाऱ्यांनी निवडणुकीचे काम रद्द करण्यासाठी अर्ज दिले आहे. त्या अर्जात “एक से बढकर एक” अशी भन्नाट कारणे देखील दिल्याची माहिती समोर आली. कुणाची पत्नी, आई आणि मुले आजारी असल्याचे कारण देत अर्ज दिलेले आहेत.
मात्र, त्यांना येवला येथील शेळके दाम्पत्य हे अपवाद ठरले. कुटुंबातील अडचणींवर मात करीत तुषार शेळके हे चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात, तर सोनाली शेळके या येवला विधानसभा मतदारसंघात जबाबदारी पार पाडण्यासाठी आनंदाने या उत्सवात सहभागी झाल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.