Nashik Lok Sabha Election : नाशिकमधून राज किंवा अमित; मनसे पदाधिकाऱ्यांचे पत्रातून आवतण

Lok Sabha Election : राज ठाकरे व गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर महायुतीत मनसेदेखील समाविष्ट होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नाशिकची जागा मनसेसाठी सोडावी या मागणीने जोर धरला आहे.
Raj Thackeray and Home Minister Amit Shah
Raj Thackeray and Home Minister Amit Shah esakal
Updated on

Nashik Lok Sabha Election : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर महायुतीत मनसेदेखील समाविष्ट होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नाशिकची जागा मनसेसाठी सोडावी या मागणीने जोर धरला आहे. याच अनुषंगाने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांनाच पत्र लिहीत ‘साहेब तुम्ही किंवा अमित यांनीच नाशिकमधून निवडणूक लढवावी’ अशी साद घातली आहे. (Nashik Lok Sabha Election Submission by letter of Raj or Amit MNS office bearers from Nashik marathi news)

परंतु ज्या पक्षासोबत युती करायची आहे. त्याच भाजपवर महापालिकेत भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आल्याने निवडणूक लांब राहिली, महायुतीत सहभागी होण्यापूर्वी मनसेतच अंतर्गत फटाके फुटण्यास सुरवात होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. महाविकास आघाडी व महायुती अशा दोन्हींमध्ये युती आघाडी होत असताना विचार बाजूला झाला आहे.

लोकसभा निवडणूक व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महायुतीत मनसेच्या रूपाने नवीन एक इंजिन जोडले जाणार आहे. मनसेची नाशिकमध्ये मोठी ताकद आहे. यापूर्वी तीन आमदार, ४० नगरसेवकांच्या माध्यमातून नाशिक महापालिकेची सत्ता नाशिककरांनी मनसेच्या हाती दिली. त्यामुळे बदलत्या राजकारणात मनसेला सत्तेचे गणित खुणावू लागले आहे. (latest marathi news)

Raj Thackeray and Home Minister Amit Shah
Nashik Lok Sabha Election : बालेकिल्ला म्हणणाऱ्या मनसेच्या जनाधाराला ओहोटी; मतांचा टक्का घटला

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला महायुतीत समाविष्ट करून घेतले जाणार असल्याने नाशिकमधून मनसेचा उमेदवार द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. याच पार्श्‍वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहीत नाशिकमधून स्वतः राज ठाकरे किंवा अमित ठाकरे यांनी लढावे अथवा स्वतंत्र उमेदवार देऊन मनसेचा प्रतिनिधी दिल्लीत पाठवावा अशी मागणी केली आहे. मनोज घोडके, अमित गांगुर्डे, निखिल सरपोतदार, संदीप भवर, किरण क्षीरसागर आदींनी ही मागणी केली.

महापालिकेच्या भ्रष्टाचाराकडे बोट

नाशिक महापालिकेतील मनसेच्या सत्ता काळात झालेल्या प्रकल्पांचा ऊहापोह करीत मनसे सैनिकांनी भ्रष्टाचारावर देखील बोट ठेवले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एकाही पदाधिकारी व कार्यकर्त्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अतिशय जमेची बाजू असल्याचे पत्रात म्हटले आहे. महापालिकेत मनसेची सत्ता गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून रस्त्यांची वाट लागली.

प्रकल्प डबघाईस गेले. त्यामुळे हा राग मतपेटीतून व्यक्त होईल अशी आशा मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. दुसरीकडे मनसेनंतर भारतीय जनता पक्षाची सत्ता महापालिकेत होती. आता महायुतीत भाजप हा महत्त्वाचा घटक पक्ष असल्याने भाजपवर साधलेला भ्रष्टाचाराचा निशाणा जिव्हारी लागल्यास महायुतीकडून निवडणूक तेवढी खेळीमेळीच्या वातावरणात होईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Raj Thackeray and Home Minister Amit Shah
Nashik Lok Sabha Election : बालेकिल्ला म्हणणाऱ्या मनसेच्या जनाधाराला ओहोटी; मतांचा टक्का घटला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.