Nashik Lok Sabha Election : ‘लहरी‘ मतदारसंघात दुभंगलेल्या शिवसेनेची कसोटी; भाजप एक तर बीएलडीचाही प्रभाव

Lok Sabha Election : कधी कॉंग्रेस, कधी भाजप पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस तर आता सलग दहा वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेला नाशिक लोकसभा मतदारसंघात कधी काय होईल याची खात्री उमेदवारांना देता येत नाही.
 nashik Lok Sabha Election
nashik Lok Sabha Electionesakal
Updated on

Nashik Lok Sabha Election : कधी कॉंग्रेस, कधी भाजप पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस तर आता सलग दहा वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेला नाशिक लोकसभा मतदारसंघात कधी काय होईल याची खात्री उमेदवारांना देता येत नाही. जुन्या जाणत्या पक्षाला भरघोस मतदान देताना मनसेसारख्या नवख्या पक्षालाही नाशिककरांनी डोक्यावर घेतले. भारतीय लोकदलाच्याही नाशिककर एक टर्म मागे राहीले. (Nashik Lok Sabha Election test for Shiv Sena divided in constituency marathi news)

सुरुवातीपासून खुल्या प्रवर्गाचा उमेदवार या मतदारसंघात उभे राहिले आहे. आठ वेळा कॉंग्रेस, चारदा शिवसेना, दोनदा राष्ट्रवादी तर भाजप व बीएलडीला प्रत्येकी एकदा नाशिककरांनी संधी दिली आहे. नाशिक लोकसभा समाजवादी, हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी की अन्य काही यावर कोणीच ठाम मत व्यक्त करू शकत नाही. त्याला कारण म्हणजे कधी विकासाचे कधी जातीचे तर कधी गाजणाऱ्या मुद्यावर अर्थात लाटेवर निवडणुक लढविली जाते व उमेदवार निवडून देखील येतात.

या मतदारसंघाला लहरी म्हणतात. सन १९६२ पासून विचार करायचा झाल्यास गो.ह. देशपांडे कॉंग्रेसच्या उमेदवारीवर पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर पोटनिवडणुकीत राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना नाशिककरांनी बिनविरोध निवडून दिले. त्यानंतर बी.आर. कवडे व भानुदास कवडे दोघेही कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडून आले. सन १९७७ च्या निवडणुकीत विठ्ठलराव हांडे भारतीय लोकशाही दलाच्या तिकीटावर निवडून गेले.

इंदिरा गांधींच्या कॉंग्रेस कडून प्रताप वाघ यांनी १९८० मध्ये विजय मिळविला. राजीव गांधींच्या काळात युवकांचे वारे वाहू लागल्यानंतर नाशिकमधून सन १९८४ मध्ये मुरलीधर माने निवडून आले. त्यानंतर भाजपने नाशिक मध्ये चुंचूप्रवेश केला. फक्त प्रवेशच केला नाही तर सन १९८९ मध्ये डॉ. दौलतराव आहेर लोकसभेवर निवडून गेले. (latest marathi news)

 nashik Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election 2024 : आमदार रोहित पवारांच्या मुक्कामाने महाविकास आघाडीत धडकी!

पुन्हा नाशिककरांनी सन १९९१ च्या निवडणुकीत डॉ. वसंत पवार यांना विजयी करत जवळ केले. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बाळसे धरलेल्या शिवसेनेला सन १९९६ मध्ये राजाराम गोडसे यांच्या रुपाने विजयी केले. त्यानंतर दोन वर्षातच पोटनिवडणुक लागली. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माधवराव पाटील यांना निवडून दिले.त्यानंतर पुन्हा वर्षभरातच निवडणुक लागली. पुन्हा नाशिककर मतदारांनी शिवसेनेचे ॲड.उत्तमराव ढिकले यांना विजयी केले.

ते वर्ष सन १९९९ चे होते. ढिकले यांच्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे देविदास पिंगळे यांना सन २००४ मध्ये निवडून दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच संधी देत सन २००९ च्या निवडणुकीत समीर भुजबळ निवडून आले. त्यानंतर सन २०१४ पासून सलग दोनदा शिवसेनेचे हेमंत गोडसे निवडून आले.

कधी जात तर कधी विकास

नाशिक लोकसभा मतदारसंघात एकदा निवडून दिलेला खासदार पुन्हा निवडून दिला जात नाही अशी परंपरा होती. खासदार गोडसे सलग दोनदा निवडून आल्यानंतर परंपरा खंडित झाली. खुल्या प्रवर्गातील या मतदारसंघात मराठा उमेदवार प्रभावी ठरतो असे म्हटले जायचे परंतू सन २००९ च्या निवडणुकीत समीर भुजबळ यांना विकासाच्या मुद्यावर नाशिककरांनी निवडून दिले. एकुण सोळा निवडणुकांमध्ये गोविंद हरी देशपांडे व समीर भुजबळ वगळता सर्वचं खासदार मराठा समाजाचे राहिले.

 nashik Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election : नाशिक मतदारसंघात आता तिघांत चौथा; लोकसभेसाठी मनसेनेही थोपटले दंड

दुसऱ्या क्रमांकाचे मते मिळालेले सोळा पैकी चौदा उमेदवार देखील मराठा समाजाचे राहिले. त्यामुळे मराठा विरुध्द मराठा उमेदवार उभा करण्याच्या चाली देखील निष्फळ ठरल्या. मनसे सारख्या नवख्या पक्षाने या मतदारसंघात दोनदा आव्हान निर्माण केले. सन २००९ च्या निवडणुकीत विकास तर सन २०१४ च्या निवडणुकीत जातीचा मुद्दा प्रभावी ठरला. सन २०१९ मध्य मोदी फॅक्टर चालला. यावरून लहरी मतदारसंघ म्हणून ओळख अधोरेखित होते.

शहरी मतदारांचा प्रभाव

नाशिक पुर्व, पश्‍चिम, मध्य व देवळालीचा अर्धा असे साडेतीन विधानसभेचे मतदारसंघ शहरी भागात आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघावर शहरी मतांचा प्रभाव आढळतो. ग्रामिण भागात शेतीचे तर शहरी भागात विकासाचे मुद्दे प्रभावी ठरतात.

 nashik Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election : आचारसंहितेचा धसका अंमलबजावणी सुरु

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.