Nashik Lok Sabha Election : कामाला लागण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सलग तीनदा सुचना; शिंदे सेनेकडून पुन्हा शक्तीप्रदर्शन

Lok Sabha Election : लोकसभेच्या नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला सोडावी यासाठी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर पदाधिकाऱ्यांनी शक्ती प्रदर्शन केले.
Lok Sabha Election
Lok Sabha Electionesakal
Updated on

Nashik Lok Sabha Election : लोकसभेच्या नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला सोडावी यासाठी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर पदाधिकाऱ्यांनी शक्ती प्रदर्शन केले. परंतु ‘तुम्ही कामाला लागा’ असा शब्द मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा देण्यात आला तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी शहरातील प्रमुख लोकांच्या व संघटनांच्या भेटीगाठी सुरू केल्याने शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या छातीत धस्स झाले आहे. (nashik lok sabha election show of strength in front of Chief Minister Eknath Shinde marathi news)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराचे राजकारण तापले आहे. पारंपरिक पद्धतीने शिवसेनेलाच हा मतदारसंघ सुटावा यासाठी शिवसेनेचा शिंदे गट आग्रही आहे. त्या दृष्टीने तयारी देखील सुरू झाली होती. परंतु अचानक राष्ट्रवादी काँग्रेसला नाशिकची जागा सुटेल व नाशिकमधून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे उमेदवार राहतील अशी चर्चा सुरू झाल्याने महायुतीत तणाव निर्माण झाला आहे.

शिंदे गटाच्या हातून जागा जाणार या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी तसेच वर्षा बंगल्यावर एकदा असे दोनदा शक्ती प्रदर्शन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘तुम्ही कामाला लागा, जागा आपलीच आहे’ असा शब्द दिल्यानंतर शक्ती प्रदर्शन करणारे पदाधिकारी माघारी फिरले. (latest marathi news)

Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election : उमेदवारी जाहीर होण्याआधीच छगन भुजबळांविरोधात बॅनरबाजी

मंगळवारी (ता. २) देखील पुन्हा खासदार हेमंत गोडसे यांच्यासह आमदार सुहास कांदे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शक्ती प्रदर्शन केले. यावेळी देखील मुख्यमंत्र्यांनी ‘तुम्ही कामाला लागा, जागा आपलीच आहे’ असा शब्द दिला. मुख्यमंत्री शब्द देतात मात्र नाशिकची जागा शिंदे गटालाच आहे असे जाहीर होत नाही. त्यामुळे नेमके काय चाललंय हे कळत नसल्याने संभ्रमाचे वातावरण शिंदे गटात निर्माण झाले आहे.

भुजबळांच्या भेटीगाठी, गोडसे परतले

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून देखील नाशिकच्या जागे संदर्भात जाहीर घोषणा होत नाही. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सल्ला देतात. त्यामुळे आज शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांसमोर शक्ती प्रदर्शन केले. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा तोच शब्द दिल्याने खासदार गोडसे यांच्यासह पदाधिकारी आज पुन्हा नाशिकमध्ये माघारी परतले. छगन भुजबळ यांनी मात्र शहरातील काही संघटना तसेच काही लोकांच्या गाठीभेटी सुरू केल्याने शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण आहे.

''नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे असा आमचा आग्रह कायम आहे. यासंदर्भात मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली.''- भाऊसाहेब चौधरी, सचिव, शिवसेना (शिंदे गट)

Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election : राजकीय वारसा नसलेला निष्ठावान कार्यकर्ता भास्कर भगरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.