Nashik Lok Sabha Constituency : पूर्वमधून महायुतीला लीड; पश्चिम, मध्यकडे लक्ष

Lok Sabha Constituency : दिंडोरी व नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता चार जून रोजी मतमोजणी होईल.
Rajabhau Waje, Hemant Godse
Rajabhau Waje, Hemant Godse esakal
Updated on

Nashik News : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघामध्ये मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट होईल. मात्र महायुतीच्या दृष्टीने शहरातील चार विधानसभा मतदारसंघापैकी कुठल्या मतदारसंघातून लीड मिळेल याकडे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचे लक्ष लागून आहे. पूर्व विधानसभा मतदार संघ हा भाजपचा बालेकिल्ला असल्याने येथून लीड मिळेल मात्र मध्य व पश्चिम मतदार संघ हा विद्यमान आमदारांना धडकी भरविणारा ठरू शकतो. (Nashik Lok Sabha Constituency)

दिंडोरी व नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता चार जून रोजी मतमोजणी होईल. २० मे ते चार जून या कालावधीमध्ये मात्र आकडेमोड सुरू आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मशाल पेटेल असे बोलले जात असले तरी महायुतीच्या नेत्यांना थोड्या मतांनी का होईना आपलाच खासदार निवडून येईल असा ठाम विश्वास आहे.

त्या अनुषंगाने महाविकास आघाडी व महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक पहायला मिळत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील सिन्नर व इगतपुरी हे ग्रामीणचे तर नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक मध्य व देवळाली हे शहरी मतदार संघ आहेत. शहरी मतदारसंघामध्ये पूर्व, मध्य व पश्चिम या तीन मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत.

तर देवळालीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आहेत. त्यामुळे महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शहरांमधून महायुतीच्या उमेदवाराला लीड मिळेल असा विश्वास आहे. या विश्वासातूनच महाविकास आघाडीसमोर विजयाचा दावा केला जात आहे. मतदारांचा कल ईव्हीएम मशीनमधून स्पष्ट होईलच. मात्र महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचे लक्ष कुठल्या विधानसभा मतदारसंघामधून लीड मिळेल याकडे लागले आहे. (latest marathi news)

Rajabhau Waje, Hemant Godse
Nashik Loksabha मध्ये भुजबळ फॅक्टर निवडणुकीत किती महत्वाचा ठरणार?

पुर्व बालेकिल्ला, मध्यमध्ये रस्सीखेच

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. भाजपच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग येथे आहे. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा एकही नगरसेवक येथून निवडून आलेला नाही. शिवसेनेच्या एक नगरसेवक वगळता, सर्व नगरसेवक हे भाजपचे आहेत.

यावरून या मतदारसंघांमध्ये भाजपच्या ताकदीचा अंदाज येतो. त्यामुळे भाजपच्या दृष्टीने पूर्व विधानसभा मतदारसंघ लीड देऊ शकतो. मात्र मध्य व पश्चिम मतदारसंघामध्ये काय परिस्थिती राहील याकडे लक्ष लागून आहे. मध्य विधानसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिम व दलित मतदारांची संख्या लक्षणीय आहे. परंतु असे असले तरी सन २०१४ व २०१९ मध्ये भाजपला या मतदारसंघाने साथ दिली आहे. परंतु आता राजकारणाचे वारे उलट्या दिशेला फिरू लागल्याने या मतदारसंघात काय स्थिती राहील यावरून पक्षाचे भवितव्य निश्चित होणार आहे.

अशीच परिस्थिती पश्चिम विधानसभा मतदारसंघांमध्ये दिसून येत आहे. या मतदारसंघांमध्ये मुस्लिम व दलित मते परिणामकारक नसली तरी महाविकास आघाडीची देखील ताकद आहे. त्या व्यतिरिक्त अपक्ष उमेदवार व जय बाबाजी परिवाराचे शांतिगिरीजी महाराज यांना या भागातून अधिक मतदान मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाबाजी किती मतदान घेतात. यावर देखील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे लक्ष लागून आहे.

Rajabhau Waje, Hemant Godse
Nashik District Hospital : सिव्हिल, कारागृहातील खाबूगिरी पुन्हा चर्चेत!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.