Nashik Parking Problem : वाहने बेसुमार अन्‌ पार्किंगची मारामार! रस्त्यावर धावतात 12 लाख दुचाकी अन 3 लाख चारचाकी

Latest Nashik News : लोकसंख्या जशी वाढली आहे, तशीच शहरात वाहनांची संख्याही वाढली असून शहरात दुचाक्या १२ लाखापेक्षा अधिक तर, चारचाकी वाहनेही ३ लाखांपेक्षा अधिक आहेत.
Vehicles parked on Bhar Street on MG Road.
Vehicles parked on Bhar Street on MG Road.esakal
Updated on

Nashik Parking Problem : शहराचे वाढते विस्तारीकरण आणि वाढती लोकसंख्येचा थेट परिणाम शहराच्या रहदारीवर होतो आहे. लोकसंख्या जशी वाढली आहे, तशीच शहरात वाहनांची संख्याही वाढली असून शहरात दुचाक्या १२ लाखापेक्षा अधिक तर, चारचाकी वाहनेही ३ लाखांपेक्षा अधिक आहेत. (Lots of vehicles parking problems)

गंगापूर रोडवर स्मार्ट पार्किंग संकल्पनेतून वाहन पार्किंगसाठी मारलेले पट्टे.
गंगापूर रोडवर स्मार्ट पार्किंग संकल्पनेतून वाहन पार्किंगसाठी मारलेले पट्टे.esakal

रस्त्यावर धावत असलेल्या वाहनांच्या तुलनेत शहरात वाहनतळांची पुरेशी व्यवस्था नाहीत. परिणामी वाहनचालकांना रस्त्यालगत आपली वाहने पार्क करावी लागतात. तर, दुसरीकडे वाहतूक पोलिसांकडून नो-पार्किंगमधील वाहनांची टोईंग केल्याने आर्थिक भूर्दंडही वाहनचालकांना सोसावा लागतो आहे. त्यामुळे शहरात वाहने झाली बेसुमार, पार्किंगची मात्र मारामार अशीच परिस्थिती आहे.

- स्मार्ट पार्किंगचे तीनतेरा

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या कार्यकाळात शहरात महापालिकेच्या माध्यमातून स्मार्ट पार्किंगची संकल्पना अमलात आणण्यात आली. शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत चारचाकी, दुचाकी पार्किंग नाही. त्यासाठी गंगापूर रोड, शरणपूर रोड, कॉलेज रोड, महात्मानगर यासह काही रस्त्यालगत दुतर्फा पिवळे पट्टे मारून स्मार्ट पार्किंगची संकल्पना राबविण्यात आली. मनपा त्यासाठी ठेकेदारामार्फत पे ॲण्ड पार्किंग वाहनचालकांना करता येणार होते. परंतु आयुक्त सिंगल यांची बदली होताच ही संकल्पना बाळगळली. तर आजही ते पट्टे रस्त्यालगत तसेच आहेत.

- स्मार्ट रोडवर अनधिकृत पार्किंग

त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ स्मार्ट रोड करण्यात आला. या रस्त्याच्या दुतर्फा रुंद फुटपाथ आणि त्यालगतच सायकल ट्रॅक आहे. परंतु या दोन्हीचा वापर अनधिकृत पार्किंगसाठी होतो. सायकल ट्रॅकवर सर्रासपणे चारचाकी वाहने पार्क केली जातात. त्यावर वाहतूक शाखेकडून ना टोईंगची कारवाई होते, ना इ-चलानद्वारे दंडात्मक कारवाई. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांची मुजोरी वाढली आहे. तर फुटपाथवर सर्रासपणे दुचाकी पार्क केल्या जातात. यावर स्मार्ट सिटी वा मनपाकडून कोणतीही कारवाई होत नाही.

- पोलिसांच्या पत्रांना केराची टोपली

शहर वाहतूक शाखेकडून शहरातील पार्किंग संदर्भात महापालिकेला वारंवार पत्रव्यवहार केले आहेत. परंतु मनपाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. याशिवाय चौकांमध्ये झेब्रा क्रॉसिंग, दिशादर्शक फलकांची उभारणी, नादुरुस्त सिग्नलची देखभाल याची जबाबदारी मनपाची असताना, त्यासाठी वारंवार पाठपुरावा पोलिस वाहतूक शाखेला करावा लागतो. मनपाकडून या पाठपुराव्यास सर्रास केराची टोपली दाखविली जाते.

- मनपाकडे जागाच नाही

शहराच्या मध्यवर्ती भागात पार्किंगसाठी जागा नाही. शिवाजी स्टेडिअमची जागा जिल्हा परिषदेची असून त्याठिकाणी पे अॅण्ड पार्कसाठी मनपाचे प्रस्ताव दिला परंतु जि.प.ने नकार दिला. स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यासाठी मनपाकडे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जागा नाही.

- पार्किंग नव्हे गोदाम

एमजी रोड, गोळे कॉलनी, शरणपूर रोड, कॉलेज रोड, गंगापूर रोड या शहराच्या मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी व्यापारी संकुल आहेत. परंतु, संकुलांच्या ठिकाणी तळमजल्यावर पार्किंग असताना त्याठिकाणी व्यावसायिकांनी त्याचा वापर गोदामासाठी केला आहे. त्यामुळे ग्राहकांना रस्त्यालगत नो पार्किंगमध्ये वाहने पार्क करावी लागतात.

- ग्राहकांना भूर्दंड

शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या एम.जी.रोड, शालिमार, मेनरोड, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, कॉलेज रोड, गंगापूर रोड, या बाजारपेठ व व्यापारी संकुलाच्या ठिकाणी आलेल्या ग्राहकांना त्यांची वाहने पार्क करण्यासाठी जागा नाही. रस्त्यालगत व्यावसायिकांनीच त्यांची वाहने पार्क केलेली असतात. (latest marathi news)

Vehicles parked on Bhar Street on MG Road.
Nashik Vidhan Sabha Election 2024 : उमेदवारांना 40 लाखांची खर्च मर्यादा; 2019 च्या तुलनेत 12 लाखांनी मर्यादा वाढली

त्यामुळे आलेल्या ग्राहकांना रस्त्यालगत बेशिस्तपणे आपली वाहने पार्क करावी लागतात. वाहतूक पोलिसांकडून अशा वाहनांची टोईंग वा इ-चलानद्वारे दंड आकारला जाऊन नाहक भूर्दंड ग्राहकांनाच सहन करावा लागतो. त्यावरून वादावादी होऊन ‘आम्हाला पार्किंगसाठी जागा द्या,’ अशी ओरड वाहनचालकांची आहे. तर त्यासाठी पोलिस त्यांना मनपाकडे मागणी करण्याचा सल्ला देतात.

"शहरात कोणत्याही ठिकाणी पार्किंगची चांगली व्यवस्था नाही. दिवसेंदिवस वाहने वाढत आहेत. मनपा प्रशासनाकडून पार्किंगबाबत ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊन त्याचा हकनाक त्रास वाहनचालक आणि व्यावसायिकांना सोसावा लागतो."- नारायणराव देशमुख, व्यावसायिक

"शहरातील कोणत्याही परिसरात पार्किंग नाही. त्यामुळे वाहने पार्क कोठे करायचीत हा प्रश्न नेहमीच पडतो. पार्क केलेले वाहन त्याचठिकाणी राहील याचीही शाश्वती नसते. त्यामुळे अनेकदा आर्थिक दंडही सहन करावा लागतो."- संतोष बागुल, नाशिक

"शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोड, सराफ बाजारात दररोज हजारो ग्राहक येतात. परंतु, त्यांना वाहने पार्क करण्यासाठी जागा नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. दुकानांसमोर वाहने पार्क केली जातात. परंतु, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवते. पार्किंगसाठी बाजारपेठेलगत जागा असायला हवी."

- योगेश खरोटे, सराफ व्यावसायिक, नाशिक

"सणउत्सवाच्या काळात मुख्य बाजारपेठेत गेल्यास वाहनांसाठी पार्किंग नसल्याने अडचणी येतात. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची अनधिकृत पार्किंग केल्याने रहदारीलाही अडथळा होऊन कोंडीची समस्या उद्‌भवते. यावर मनपा प्रशासन व पोलिस यंत्रणेने सकारात्मकेने उपाययोजना करण्याची गरज आहे."- प्रशांत कुरकुरे, नाशिक

"सर्व दोष मनपा वा पोलिस यंत्रणेला देऊन उपयोगाचे नाही. नो-पार्किंगचा फलक असताना त्याठिकाणी वाहने पार्क केली जातात. त्यामुळे रस्ता रहदारीला अडथळा निर्माण होणारच आहे. शहरात पार्किंगसाठी जागा नाही हे जरी खरे असले तरी वाहतूक नियमांचेही पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्याचे जरी पालन केले तर अर्धेअधिक समस्या सुटण्यास मदत होऊ शकेल."- मंदार देशमुख, नाशिक

"शहराच्या मध्यवर्ती भागात पार्किंग नाही. व्यापारी संकुलांनी पार्किंगच्या जागेत गोडाऊन केले आहेत. त्यामुळे ग्राहकांना रस्त्यावर वाहने पार्क करावी लागतात. मनपाने पे ॲण्ड पार्कची सुविधा सुरू केल्यास पार्किंगची समस्या सुटण्यास मदत होईल. वाहनचालकांनीही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे."

- दिवाणसिंग वसावे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा युनिट-२

शहरातील वाहन संख्या

दुचाकी : १२९६१७८

स्कूटर : २३२५१९

मोपेड : ६७२९१

कार : २८६६८५

जीप : ३०५१६

रिक्षा : ३२३६०

कॅब : ५७४८

स्कूल बसेस : २६५६

रुग्णवाहिका : ९१६

ट्रक : ३६५९०

टँकर : ६०१

डिलीव्हरी व्हॅन (चारचाकी) : ४८७१०

डिलीव्हरी व्हॅन (तीनचाकी) : १६६४

Vehicles parked on Bhar Street on MG Road.
Nashik: सार्वजनिक बांधकामच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्तीच्या निविदा आल्यास फेरनिविदा! अडीचशे कोटींपेक्षा जास्तीच्या कामांसाठी निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.