नांदूरमध्यमेश्वर : येथे महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी (ता. ८) मोठी यात्रा भरणार आहे. गोदावरी, दारणा, कादवा या नदींच्या त्रिवेणी संगमावर व दक्षिण वाहिनी असलेल्या ठिकाणी श्री गंगामध्यमेश्वर, मृगव्याधेश्वर, सिद्धेश्वर, बाणेश्वर, गणपती मंदिर आदी मंदिरांना रंगरंगोटी, सजावट केली आहे. मंदिरांवर आकर्षक रोषणाईही केली आहे. होळकर कालीन रथाचे रंगकाम झाले आहे. (nashik Maha Shivratri Nandur Madhyameshwar marathi news)
यात्रेनिमित्त फराळ, मिठाई, तसेच उन्हाळ्याची चाहूल लागल्याने मातीच्या घागरी, माठ, मडके आदींची दुकाने थाटली आहेत. ग्रामपंचायतीने दुकानांना जागा व दिवाबत्तीची सोय करून दिली आहे. दक्षिण वाहिनी गोदावरीत भाविकांना स्नानासाठी पाण्याअभावी गैरसोय होऊ नये, म्हणून पाटबंधारे प्रशासनाने नदीपात्रात यात्रेपूर्वी पाणी सोडले आहे. दोन दिवस चालणारा यात्रोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत, ग्रामस्थ व यात्रा समिती प्रयत्नशील आहे, अशी माहिती यात्रा समितीचे कैलास शिंदे, नवनाथ वैद्य व सदस्यांनी दिली.
शुक्रवारी सकाळी नऊला गंगामधमेश्वराचे मुखवट्याची पूजा सरपंच गायत्री इकडे यांच्या हस्ते होईल. नंतर मुखवट्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. सजविलेल्या रथाला बैलांचा मान निफाड येथील शेतकरी दीपक भुतडा यांना मिळाला आहे. पुढे हा रथ गोदावरी, कादवा व दारणा नद्यांच्या त्रिवेणी संगमावरील श्री गंगामध्यामेश्वर मंदिरपर्यंत जाऊन मुखवटा सप्त धान्यात ठेवून होमहवन होणार आहे. (Latest Marathi News)
महिला शिवलीला अमृताचे पठण करतील. दुपारी चारला कुस्त्यांची दंगल होणार आहे. रात्री आठ ते दहादरम्यान ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांचे कीर्तन होईल. दहाला सविता पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम होणार आहे.
शनिवारी (ता. ९) रात्री आठला सजविलेल्या रथाची मिरवणूक निघेल. फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे. गंगामाध्यमेश्वर मंदिरापर्यंत रथ जाईल. तेथून मुखवटा वस्तीतील मंदिरात आणला जातो. आरोग्य उपकेंद्रातर्फे आरोग्य कक्ष उभारण्यात येणार आहे. पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.