Nashik Teacher Constituency Election : दराडे- ॲड. गुळवे- कोल्हे यांच्यात रंगणार तिरंगी सामना

Teacher Constituency Election : नाशिक शिक्षक मतदारसंघाकडे महायुतीसह महाविकास आघाडीने विशेष लक्ष केंद्रीत केले.
Kishor Darade, Adv. Sandip Gulve and Vivek Kolhe
Kishor Darade, Adv. Sandip Gulve and Vivek Kolheesakal
Updated on

Nashik News : विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघात अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी बुधवारी (ता. १२) महायुती आणि महाविकास आघाडीत अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीत नाशिकच्या जागेवरून झालेला तिढा सोडविण्यात वरिष्ठांना यश मिळाल्याने काँग्रेसकडून अर्ज दाखल करणाऱ्या दिलीप पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. (Nashik Teacher Constituency Election)

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे, तसेच भारतीय जनता पक्षाचे निशांत रंधे, धनराज विसपुते, सुनील पंडित यांची माघारी घेण्यात महायुतीला यश मिळाले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड. महेंद्र भावसार यांची उमेदवारी कायम राहिल्याने महायुतीची डोकेदुखी कायम आहे.

आता रिंगणात एकूण २१ उमेदवार असले, तरी महायुतीचे विद्यमान आमदार किशोर दराडे, महाविकास आघाडीचे उमेदवार अॅड. संदीप गुळवे आणि अपक्ष विवेक कोल्हे यांच्यातच तिरंगी सामना रंगेल. लोकसभा निवडणुकीनंतर होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीने आपली ताकद लावली आहे.

यात नाशिक शिक्षक मतदारसंघाकडे महायुतीसह महाविकास आघाडीने विशेष लक्ष केंद्रीत केले. महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गेलेली असताना येथून काँग्रेसचे दिलीप पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करीत रिंगणात उतरविल्याने या जागेवरून महाविकास आघाडीत तेढ निर्माण झाला होता.

मात्र, गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांशी चर्चा केली. तसेच, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी चर्चा करीत मार्ग काढला. त्यानंतर महाविकास आघाडीतील तिढा सुटला. यात, कोकण पदवीधरमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या किशोर जैन यांनी माघार घेतली; तर नाशिकमध्ये काँग्रेसच्या दिलीप पाटील यांनी माघार घेतली.

Kishor Darade, Adv. Sandip Gulve and Vivek Kolhe
Nashik Teachers Constituency Election : शिर्डीत शिक्षक मतदारसंघासाठी उत्तर महाराष्ट्राची बैठक

त्यामुळे महाविकास आघाडीकडून अॅड. गुळवे रिंगणात राहिले. महायुतीतील शिवसेनेकडून विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून महेंद्र भावसार यांनी व धुळे शिक्षक लोकशाही आघाडीचे सदस्य तसेच भाजपचे पदाधिकारी निशांत रंधे, धनराज विसपुते यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

याशिवाय, भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला असल्याने महायुतीची डोकेदुखी वाढलेली होती. अखेरच्या दिवशी राजेंद्र विखे यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास महायुतीला यश आले. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः रिंगणात उतरले होते. त्यांनी मंत्री विखे यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.

याशिवाय मुख्यमंत्री शिंदे, आमदार दराडे यांनी भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा करून रंधे, विसपुते यांचे अर्ज माघारी करून घेतले. भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र तथा पदाधिकारी विवेक कोल्हे यांची माघारी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न महायुतीकडून झाले. मात्र, या प्रयत्नांना यश मिळाले नाही.

या तुल्यबळ उमेदवारांची माघार झाल्याने महायुतीचे बळ वाढले. या माघारीनाट्यानंतर आता महायुतीचे आमदार दराडे, महाविकास आघाडीचे अॅड. गुळवे, अपक्ष विवेक कोल्हे यांसह तब्बल १८ उमेदवार रिंगणात राहिले. रिंगणात २१ उमेदवार दिसत असले, तरी मुख्य लढत ही दराडे, गुळवे आणि कोल्हे यांच्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले.

Kishor Darade, Adv. Sandip Gulve and Vivek Kolhe
Nashik Teacher Constituency Election : ‘महाविकास’तर्फे गुळवेंचे नाव जवळपास निश्चित; उद्या उमेदवारीची घोषणा

विखेंच्या माघारीचे अखेरपर्यंत सस्पेन्स

प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे माघारीसाठी शहरातील एका हॉटेलमध्ये उतरले होते. मात्र, माघारीसाठी ते केव्हा येतील, याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयात चर्चेचा विषय झाला होता. अडीच- पावणेतीन झाले, तरीही ते उपस्थित झालेले नव्हते. मात्र, त्यांचे सूचक विजय खर्डे यांनी माघारी घेतली असल्याचे अखेरच्या क्षणी समोर आल्याने त्यांच्या माघारीचे सस्पेन्स अखेरपर्यंत कायम राहिले.

माघारीनंतर थेट ठाकरेंशी संवाद

महाविकास आघाडीतील जागेचा तिढा सुटल्यावर काँग्रेसचे उमेदवार डी. बी. पाटील यांची माघारी झाली. या माघारीनंतर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी तेथूनच पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला. यात, पाटील यांच्याबरोबर पक्षप्रमुख ठाकरे यांनी चर्चा केली. तुम्ही आघाडीचा आदेश पाळल्याबद्दल भविष्यात तुमचा विचार केला जाईल, असे आश्वासन ठाकरे यांनी दिल्याचे बोलले जात आहे.

दोन गुळवे अन्‌ तीन कोल्हे रिंगणात

नामसाधर्म्य असल्याने दिंडोरी लोकसभेची निवडणूक चांगलीच चर्चेत आली. यामुळे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतही नामसाधर्म्याचा प्रयोग उमेदवारांनी करीत एकमेकांच्या अडचणी वाढविण्याचा प्रयत्न केला. महायुतीचे उमेदवार किशोर भिकाजी दराडे यांच्या नावाशी साधर्म्य असलेले किशोर प्रभाकर दराडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

Kishor Darade, Adv. Sandip Gulve and Vivek Kolhe
Nashik Teachers Constituency Election : विधान परिषदेसाठी जिल्ह्यात 29 मतदान केंद्रे; नाशिकमध्ये सर्वाधिक 10 केंद्रे

अॅड. संदीप गुळवे यांच्या नावांशी साम्य असलेले संदीप नामदेव गुळवे (ता. संगमनेर), संदीप भीमाशंकर गुळवे (धुळे) या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अपक्ष उमेदवार विवेक बिपीनदादा कोल्हे यांच्या नावाशी साम्य असलेले संदीप वसंत कोल्हे (मनमाड) आणि सागर रवींद्र कोल्हे (ता. चांदवड, जि. नाशिक) यांनी अर्ज दाखल केलेले होते. नावात साम्य असलेल्या उमेदवारांचा फटका बसण्याची शक्यता असल्याने या तिन्ही उमेदवारांची चिंता वाढली होती.

यात आमदार दराडे यांनी नामसाधर्म्य किशोर दराडे यांची माघार घेतली. तर, संदीप गुळवे-पाटील (धुळे) यांची माघार घेण्यात अॅड. गुळवे यांना यश आले. त्यामुळे आता गुळवे यांच्याबरोबर संदीप नामदेव गुळवे, संदीप वामनराव गुरुळे, तसेच विवेक कोल्हे यांचे नामसाधर्म्य असलेले सागरदादा रवींद्र कोल्हे, संदीप वसंतदादा कोल्हे रिंगणात आहेत.

Kishor Darade, Adv. Sandip Gulve and Vivek Kolhe
Nashik Teacher Constituency Election : शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत 38 पैकी 2 उमेदवारांचे अर्ज अवैध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.