Disaster Management : संभाव्य आपत्ती निवारण व्यवस्थापनात महाराष्ट्राचा डंका!

Nashik News : उत्तराखंडमधील पाच तलाव (जलाशये) धोकादायक ठरू शकतात. यामुळे चमोली व पिथोरागड जिल्ह्यातील विविध भागांत जलप्रपात होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
Disaster Management
Disaster Management esakal
Updated on

डेहराडून (उत्तराखंड) : उत्तराखंडमधील पाच तलाव (जलाशये) धोकादायक ठरू शकतात. यामुळे चमोली व पिथोरागड जिल्ह्यातील विविध भागांत जलप्रपात होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर या तलावांना पंक्चर करण्याची मोहीम जुलैमध्ये राबविण्यात येणार असून, या मोहिमेचे नेतृत्व महाराष्ट्रातील सी डॅक (पुणे) करणार आहे. (Maharashtra tops in potential disaster relief management)

उत्तराखंड राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीचे सचिव डॉ. रंजित सिन्हा यांनी यास दुजोरा दिला. देशातील विविध वैज्ञानिक संस्थांनी उत्तराखंडमधील १३ धोकादायक तलावांचे सर्वेक्षण केले होते. यातील चमोली व पिथोरागड जिल्ह्यातील पाच तलावांत ग्लेशियर विरघळून वाढता जलसंचय व गळतीमुळे जलप्रपात येण्याचा धोका असल्याने केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे या तलावांच्या सुरक्षेसाठी काम करत आहे.

डॉ. सिन्हा यांनी सांगितले, की या तलावांना वैज्ञानिक पद्धतीने पंक्चर करून ही आपत्ती टाळण्यासाठी प्रयत्न केला जाईल. या भागातील ग्लेशियर लागोपाठ विरघळत असल्याने या तलावांचा जलस्तर व संचय वाढत आहे. सॅटेलाइटने व स्थानिक स्तरावर प्रशासन त्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष देत आहे.

या तलावांना पंक्चर करण्याच्या मोहिमेत सी डॅक (पुणे) यांच्या नेतृत्वाखाली वाडिया इन्स्टिट्यूट, जीएस आई लखनौ, एनआईएच रुरकी, आईआईआरएस डेहराडून यासह विविध एजन्सी सहभागी होणार आहेत. सी डॅकच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी यास दुजोरा दिला, मात्र मोहिमेतील सदस्यांची नावे सांगता येणार नाहीत, असे सांगितले. (latest marathi news)

Disaster Management
Nashik YCMOU News : ‘मुक्‍त’च्‍या एमबीए, बीसीएची सीईटी अर्जाची 13 पर्यंत मुदत

असे आहेत धोकादायक तलाव

१) वसुंधरा तलाव, धौलीगंगा : चमोली आकार ०.५० हेक्टर, उंची चार हजार ७०२ मीटर.

२) अनोळखी तलाव, पिथोरागड : दारमा (अनक्लासिफाइड) आकार ०.९ हेक्टर, उंची चार हजार ७९४ मीटर.

३) मबान तलाव, लस्सर यांगती व्हॅली, पिथोरागड : आकार ०.११ हेक्टर, उंची चार हजार ३५१ मीटर.

४) अनोळखी तलाव, पिथोरागड : कूठी यांगति व्हॅली (अनक्लासिफाइड) आकार ०.४ हेक्टर, उंची चार हजार ८६८ मीटर.

५) प्युंगू तलाव, पिथोरागड, दारमा बेसिन : आकार ०. ०२ हेक्टर, उंची चार हजार ७५८ मीटर.

आपत्ती व्यवस्थापन सतत सज्ज

उत्तराखंडची लहान-मोठ्या नैसर्गिक आपत्तीतून सुटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत. येथील राज्य शासन, राज्य आपत्ती व्यवस्थापन, प्रशासन व नागरिकही जणू काही यासाठी या सज्ज असल्याची प्रचीती येते. डॉ. सिन्हा यांच्या कार्यालयात प्रस्तुत प्रतिनिधीने दूरध्वनी केला असता ते सुटीवर असल्याचे कार्यालयातून सांगण्यात आले. भ्रमणध्वनी क्रमांक मागितला तोही तातडीने देण्यात आला. यानंतर डॉ. सिन्हा यांना भ्रमणध्वनी केला असता सुटीवर असूनही त्यांनी तातडीने प्रतिसाद दिला.

अशी असेल तलाव पंक्चर प्रक्रिया

तलाव देखरेखीसाठी विविध उपकरणे असतील. ही उपकरणे सॅटेलाइटने लिंक करण्यात येतील. तलावाची स्थिती पाहून जलस्तर कमी करण्यासाठी डिस्चार्ज क्लिप व पाइप टाकले जातील. यामुळे तलाव पंक्चर होईल. तांत्रिक पथक या तलावांच्या भिंती किती मजबूत व खोल आहेत याचा अभ्यास करणार आहेत.

Disaster Management
Nashik Junior Collage Admission : पहिल्‍या फेरीत 6 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश; दुसऱ्या फेरीची उद्यापासून प्रक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com