MUHS Written Exam : आरोग्य विद्यापीठाच्या लेखी परीक्षा उद्यापासून; दुसऱ्या टप्यांत राज्‍यातील 207 केंद्रांवर परीक्षा

Written Exam : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र २०२४ अंतर्गत दुसऱ्या टप्‍यातील लेखी परीक्षेला सुरवात होत आहे.
MUHS Written Exam : आरोग्य विद्यापीठाच्या लेखी परीक्षा उद्यापासून; दुसऱ्या टप्यांत राज्‍यातील 207 केंद्रांवर परीक्षा
Updated on

Nashik News : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र २०२४ अंतर्गत दुसऱ्या टप्‍यातील लेखी परीक्षेला सुरवात होत आहे. शनिवार (ता.२२) पासून राज्‍यभरातील २०७ परीक्षा केंद्रांवर या परीक्षेचे आयोजन केले आहे. विद्यापीठाच्या विविध पदवी, पदव्युत्तर व विद्यापीठ संचलित अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा राज्यातील एकूण २०७ परीक्षा केंद्रावर घेतल्‍या जाणार आहेत. ( Maharashtra University of Health Sciences written exam )

या परीक्षेत पदवी स्‍तरावरील दंतशास्‍त्र (बीडीएस), आयुर्वेद (बीएएमएस), युनानी (बीयुएमएस), होमिओपॅथी (बीएचएमएस) यांसह उर्वरित पदवी अभ्यासक्रमाच्या तसेच बी. एस्सी. नर्सिंग, बेसिक बी.एस्सी. नर्सिंग, पीबीबी एस्सी. नर्सिंग, फिजिओथेरेपी (बीपीटीएच), ऑक्‍युपेशनल थेरेपी (बीओटीएच), बीपीओ, बीएएसएलपी, उर्वरित पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एमडीएस., डिप्लोमा डेन्टींस्ट्री, एम.डी.-एम.एस. आयुर्वेद अॅण्ड युनानी, डिप्लोमा आयुर्वेद, एम.डी. होमिओपॅथी, एम.ओ.टी.एच., एम.एस्सी. नर्सिंग, एम.पी.टी.एच., एम.पी.टी., एम.ए.एस.एल.पी. , एम.एस्सी. (ऑडिओलॉजी), एम.एस्सी., (एस.एल.पी.), एम.पी. ओ. या शिक्षणक्रमांच्‍या परीक्षा घेण्यात येणार आहेत. (latest marathi news)

MUHS Written Exam : आरोग्य विद्यापीठाच्या लेखी परीक्षा उद्यापासून; दुसऱ्या टप्यांत राज्‍यातील 207 केंद्रांवर परीक्षा
Nashik News : धरणसाठा 79 कोटी 10 लाख लिटरने ‘समृद्ध’

विद्यापीठ संचलित अभ्यासक्रमात एम.पी.एच., एम.पी.एच (एन), एम.बी.ए., एम. फिल., बी. ऑप्टोमेट्री, डिप्लोमा ऑप्टोमेट्री/ऑप्थॉलमिक, डिप्लोमा पॅरामेडिकल, सी.सी.एम.पी., एम.एम.एस.पी.सी., पी.जी. डि.एम.एल.टी., बी.पी.एम.टी., एम.एस्सी. फार्मास्युटिकल अभ्यासक्रमाच्या परीक्षा विद्यापीठाच्‍या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.

८२ हजार विद्यार्थी जाणार सामोरे

परीक्षेची संपूर्ण तयारी झालेली आहे. या परीक्षेसाठी विविध अभ्यासक्रमांचे सुमारे ८२ हजार २६७ विद्यार्थी सामोरे जाणार आहेत. याबाबतची माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी दिली आहे.

MUHS Written Exam : आरोग्य विद्यापीठाच्या लेखी परीक्षा उद्यापासून; दुसऱ्या टप्यांत राज्‍यातील 207 केंद्रांवर परीक्षा
Nashik News : इंदिरानगर परिसरातील घरकुल इमारतीस घरघर! लाखो रुपये पाण्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()