Mahatma Gandhi Employment Scheme : 10 हजार मजुरांची 34 कोटींची थकली मजुरी

Mahatma Gandhi Employment Scheme : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील जिल्ह्यातील १० हजार मजुरांची गत तीन महिन्यांपासून ३३.९९ कोटींची मजुरी थकली आहे.
Mahatma Gandhi Employment Scheme
Mahatma Gandhi Employment Schemeesakal
Updated on

Mahatma Gandhi Employment Scheme : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील जिल्ह्यातील १० हजार मजुरांची गत तीन महिन्यांपासून ३३.९९ कोटींची मजुरी थकली आहे. रोजगार हमीच्या कामांवर काम करीत असलेल्या मजुरांच्या खात्यात आठवडाभरात रक्कम जमा केली जात असताना केंद्र सरकारने नोव्हेंबर २०२३ पासून मजुरांच्या खात्यात रक्कम जमा केली नाही. (nashik Mahatma Gandhi Employment Scheme unpaid wages of workers marathi news)

मजुरी थकल्याने रोजगार हमीवरील जिल्ह्यातील सार्वजनिक कामे ठप्प झाली असून, केवळ वैयक्तिक कामे सुरू आहेत. वर्षातील किमान १०० दिवस मजुरांना रोजगाराची हमी देणारा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कायदा केंद्र सरकारने केला आहे. यात मजुरांची ऑनलाइन हजेरी घेऊन दर आठवड्याला त्यांच्या कामाची रक्कम जमा केली जाते.

ही रक्कम केंद्र सरकार थेट मजुरांच्या खात्यात जमा करते. रोजगार हमी मजुरांचे पैसे कधीही थांबविले जात नसल्याने रोजगार हमी योजनेविषयी मजुरांमध्ये एक विश्वास निर्माण झालेला आहे. मात्र, गत नोव्हेंबर, डिसेंबर २०२३ आणि जानेवारी २०२४ या तीन महिन्यांचे रोजगार हमी मजुरांचे पैसे केंद्र सरकारने मजुरांच्या खात्यात वर्ग केलेले नाहीत.

संकेतस्थळावरील तांत्रिक समस्या असू शकते, असे गृहीत धरले जात होते. मात्र, आता फेब्रुवारी संपत आलेला असतानाही मजुरांच्या खात्यात रक्कम वर्ग झालेली नाही. त्यामुळे मजुरांना उसनवार करण्याची नामुष्की आली आहे. रोजगार हमीवर इतर रोजंदारीच्या कामापेक्षा कमी रक्कम मिळते. मात्र, वर्षभर काम तसेच प्रत्येक आठवड्याला मिळणारी मजुरी यामुळे मजूर रोजगार हमीला प्राधान्य दिले जाते.

Mahatma Gandhi Employment Scheme
Nashik AIMA News : अक्राळेतील औद्योगिक भूखंड विक्री लिलाव पद्धतीने करू नका; आयमाचे MIDC अधिकाऱ्यांना साकडे

मात्र, आता तीन महिन्यांपासून रक्कम थकल्याने मजुरांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रोजगार हमी योजनेतून अनेक कुशल कामे जसे शिवार रस्ते, पाणंद रस्ते, सिमेंट बंधारे, वैयक्तिक लाभाच्या योजना आदी कामे केली जातात. या कामांमध्ये ६० ते ९० टक्क्यांपर्यंत कुशल व उर्वरित अकुशल कामे केली जातात. मजुरी थकली असल्याने केवळ वैयक्तिक कामे जिल्ह्यात सुरू आहेत. सार्वजनिक कामे जसे वन विभागाचे वनतळे, शिवार रस्ते, सिमेंट बंधारे यांची कामे बंद आहेत.

दुष्काळात मजुरांचे हाल

दरम्यान, यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे. यातच फेब्रुवारीत दुष्काळाच्या झळा ग्रामीण भागात तीव्र झाल्या आहेत. यामुळे रोजगार हमीच्या कामांवर मजुरांची मदार असते. मात्र, कामाची मजुरी मिळत नसल्याने आगामी काळात काम मिळण्याची शक्यता कमी असल्याने मजुरांचे हाल होत असून, स्थलांतर वाढण्याची शक्यता आहे.

तालुकानिहाय थकीत मजुरी

बागलाण (४.५४ कोटी), चांदवड (४.१८ कोटी), देवळा (१.३२ कोटी), दिंडोरी (८६ लाख), इगतपुरी (३७ लाख), कळवण (५९ लाख), मालेगाव (४.७८ कोटी), नांदगाव (९.५८ कोटी), नाशिक (१९ लाख), निफाड (१.०६ कोटी), पेठ (४९ लाख), सिन्नर (९६ कोटी), सुरगाणा (३१ लाख), त्र्यंबकेश्वर (४६ लाख), येवला (३.२५ कोटी). ( latest marathi news )

Mahatma Gandhi Employment Scheme
Nashik News : 8 दिवसांत वडाळा घरकुलात स्थलांतर करा; गंजमाळ श्रमिकनगरवासियांना महापालिकेची नोटीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.