Nashik Vidhan Sabha Election : ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधारी महायुतीकडून नाशिकमध्ये शनिवारी (ता. २८) विविध विकासकामांचे लोकार्पण व उद्घाटनांचा बार उडविला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह अर्धा डझन मंत्री यानिमित्त शहरात येत आहेत. नाशिकच्या राजकीय पटलावर शाब्दिक फटकेबाजी पाहायला मिळणार आहे. (mahayuti actions of inaugurations before vidhansabha election)
राज्यात नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीची पीछेहाट झाल्याने सत्ताधारी महायुतीसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षिय पातळीवर विचारांची बैठक पक्की करताना मागील पाच वर्षात झालेल्या विकासकामांच्या उद्घाटनाचा वेग वाढला आहे.
निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी मतदारांसमोर विकासकामे घेऊन जाण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी नाशिकमध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण व उद्घाटन त्याचप्रमाणे विविध कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी महायुतीचे मोठे नेते शहरात दाखल होत आहे. पालकमंत्री दादा भुसे, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती राहील. विकासकामांच्या निमित्ताने महायुतीकडून शक्ती प्रदर्शन देखील केले जाणार आहे.
मराठा, धनगर वसतिगृहाचे भूमिपूजन
आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नातून सारथी या संस्थेचे मराठा समाजातील ५०० विद्यार्थी व पाचशे विद्यार्थ्यांसाठी दहामजली वसतिगृह व संस्थेच्या विभागीय कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन होणार आहे. धनगर समाजातील शंभर विद्यार्थ्यांनी व शंभर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचे बांधकाम कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होईल. (latest marathi news)
ठाकरे स्मृती उद्यानाचे लोकार्पण
शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांच्या प्रयत्नातून गंगापूर रोड जुने पंपिंग स्टेशन येथे हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान उभारण्यात आले आहे. यात आठ गॅलरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कौशल्यांचा परिचय करून देणाऱ्या ध्वनिफिती, चित्रफिती, वाचनालय, ५०० आसनी खुले नाट्यगृह, ॲडव्हेंचर पार्क, ३०० आसनी बहुउद्देशी सांस्कृतिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा होणार आहे.
फुले स्मारकाचे लोकार्पण
मुंबई नाका येथे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे. फुले दांपत्याच्या ब्रॉँझ धातूपासून बनविलेल्या अर्धाकृती पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे.
--विकासकामे--
- - गंगापूर रोड येथे जलतरण तलावाचे उद्घाटन.
- हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील कामांचे लोकार्पण
-- महानुभाव पंथ मेळावा.
- आयटीआय पूल ते वावरेनगर रस्ता कॉँक्रिटीकरण भूमिपूजन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.