Nashik Lok Sabha Constituency : चर्चा नाशिक मतदारसंघाची; अस्वस्थता देवळा, चांदवडमध्ये

Lok Sabha Constituency : नाशिक मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीवरुन चर्चा रंगली असताना त्याची अस्वस्थता मात्र चांदवड व देवळ्यात पसरली आहे.
Lok Sabha Constituency
Lok Sabha Constituencyesakal
Updated on

Nashik Lok Sabha Constituency : नाशिक मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीवरुन चर्चा रंगली असताना त्याची अस्वस्थता मात्र चांदवड व देवळ्यात पसरली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीत नाशिक लोकसभेच्या जागेवरुन वाद सुरू आहे. महायुतीचे तिन्ही प्रमुख पक्ष नाशिकच्या जागेसाठी आग्रही आहेत. शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे उमेदवारीसाठी आग्रही होते. ()

मात्र, दुसऱ्या दिवशीच भाजपने या दोन्ही उमेदवारांना 'खो' देत नवीन उमेदवारांची चाचपणी सुरू केली. यात चांदवड- देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांचेही नाव चर्चेत आल्याने एकीकडे भाजपच्या नाशिकच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सूकता असली तरी या चर्चेमुळे चांदवड- देवळा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

आमदार राहुल आहेर हे गेल्या दोन टर्मपासून भारतीय जनता पक्षाचे चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवार शिरीष कोतवाल यांचा पराभव केला होता. तसेच त्यांच्या मागे वडिलांचा राजकीय वारसा आणि ताकद देखील आहे.  (latest marathi news)

Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency : दिंडोरी मतदारसंघात उमेदवारीत कोकणा समाजाचे वर्चस्व

डॉ. दौलतराव आहेर हे गेल्या तीन दशकातील झपाटलेला नेता म्हणून ओळखले जात होते. त्यांचा वारसा घेऊन त्यांच्या पुत्राची मतदारसंघातील वाटचाल सुरू आहे. गेल्या नऊ दहा वर्षांत त्यांची कार्यपद्धती व कार्यक्षमता यामुळे कार्यकर्त्यांशी जवळीक वाढली आहे.

यामुळेच त्यांच्या कार्यकर्त्यांना यापुढेही तेच आमदार राहावेत अशी इच्छा आहे, मात्र नाशिक लोकसभेसाठी डॉ. राहुल आहेर यांचे नाव चर्चेत आल्याने कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘राहुल आहेर हे चांदवड- देवळ्याचे आमदार राहावेत...त्यांनी नाशिक लोकसभा लढवू नये..’या आणि अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर भाजपचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत...

Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency : धुळ्याच्या उमेदवारीने जिल्हा काँग्रेसतंर्गत गटबाजी उफाळली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()