नाशिक : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर विविध संस्थांच्या एक्झिट पोल्सचे निकाल समोर आले. यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीला संमिश्र कौल मिळाल्याने संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीने संभाव्य अपक्ष उमेदवारांवर फासे टाकण्यास सुरुवात केली आहे. कोणत्याही आघाडीला बहुमत न मिळाल्यास अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे आता महाविकास आघाडीने बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधायला सुरुवात केली आहे.