नाशिक : गेल्या काही काळात मराठी तरुणांना रोजगार मिळवून देणारे महाराष्ट्रातील अनेक मोठे प्रकल्प हे गुजरातला गेले होते. यामागे राजकीय कारस्थान असल्याचे अनेक आरोपप्रत्यारोप झाले होते. त्यातच आता पुन्हा एकदा एक मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जाणार असल्याची चर्चा आहे. या विरोधात औद्योगिक संघटना आक्रमक झाल्या आहेत.