Nashik Vidhan Sabha Election 2024: तिसरी आघाडी कुणाची करणार बिघाडी? पक्षांच्‍या हालचालींकडे प्रस्‍थापितांचे राहणार लक्ष

Vidhan Sabha Election : राजकीय पक्षांच्‍या तसेच इच्‍छुकांच्‍याही वाढलेल्‍या संख्येमुळे विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची भाऊगर्दी होणार आहे.
Nashik Vidhan Sabha
Nashik Vidhan Sabha Election esakal
Updated on

नाशिक : राजकीय पक्षांच्‍या तसेच इच्‍छुकांच्‍याही वाढलेल्‍या संख्येमुळे विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची भाऊगर्दी होणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्‍यात प्रमुख लढत होणार असली तरी ‘परिवर्तन महाशक्‍ती’सह इतर आघाड्यांनीही रणशिंग फुंकले आहे. ही तिसरी आघाडी विजयी पताका फडकविणार की इतर पक्षांची बिघाडी करणार हे निकालानंतर स्‍पष्ट होऊ शकणार आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाचा प्रत्‍येक टक्‍का महत्त्वाचा ठरणार आहे. (main fight will be between Maha Vikas Aghadi and Mahayuti)

त्‍यामुळे अधिकाधिक मतदान व्‍हावे, यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्‍नशील राहतील. आधीच दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी निवडणूक रिंगणात आहेत. त्‍यातच संभाजीराजे छत्रपती, ‘प्रहार’चे बच्चू कडू आणि स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी मोट बांधत परिवर्तन महाशक्‍तीची घोषणा केलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याकडून बच्चू कडू यांची मनधरणी सुरू असल्‍याची चर्चा प्रादेशिक स्‍तरावर सुरू आहे. संभाजीराजे छत्रपती नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्‍यामुळे परिवर्तन महाशक्‍तीच्‍या पातळीवर हालचालींना वेग आलेला दिसतो. (latest marathi news)

Nashik Vidhan Sabha
Vidhan Sabha Election 2024: ठरलं! आज दुपारपासूनच आचारसंहिता; निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, तारखा होणार जाहीर

दुसरीकडे डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली वंचित बहुजन आघाडी निवडणूक तयारीला लागली आहे. मनोज जरांगे पाटील यांचाही नाशिक जिल्ह्यावर प्रभाव राहिलेला आहे. या वेगवेगळ्या आघाड्या निवडणूक रिंगणात उतरल्‍यास नाशिक जिल्हास्‍तरावर कुठल्‍या पक्षांना त्‍याचा लाभ होतो, कुणाला फटका बसतो, हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्‍यामुळे बलाढ्य पक्षांकडून या आघाड्यांच्‍या हालचालींकडे बारकाईने लक्ष दिले जाते आहे. आम आदमी पक्षाचा मात्र शहरासह जिल्ह्यात फारसा प्रभाव दिसून येत नाही.

बंडखोरांना मिळणार व्‍यासपीठ

मोठ्या पक्षांमध्ये इच्‍छुकांच्‍या रांगा लागलेल्‍या आहेत. याशिवाय जागावाटपानंतर अन्‍य पक्षाला जागा सुटल्‍यानंतर निवडणूक तयारी केलेल्‍या उमेदवारांकडून बंडखोरीची शक्‍यता नाकारता येत नाही. परंतु अपक्ष उमेदवारी करणे त्‍यांच्‍यासाठी सोपे ठरणार नाही. अशात यापूर्वीच उमेदवारांनी तयारी केलेल्‍या आयत्‍या उमेदवारांची वेगवेगळ्या पक्ष, आघाड्यांशी गट्टी जुळल्‍यास निवडणुकीचे संपूर्ण चित्र बदलू शकते, असे जाणकारांचे म्‍हणणे आहे.

Nashik Vidhan Sabha
Nashik Vidhan Sabha Election 2024 : उमेदवारांना 40 लाखांची खर्च मर्यादा; 2019 च्या तुलनेत 12 लाखांनी मर्यादा वाढली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.