Nashik News : सांडपाणी अडविण्यासाठी नदी किनारी मुख्य मलवाहिका

Nashik : उच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या अनुषंगाने सातपूर विभागातील नदीलगत व नाल्यालगत मुख्य मलवाहिका तसेच ब्रांच लाईन टाकण्याचा निर्णय मलनिस्सारण विभागाकडून घेण्यात आला आहे.
River sewage
River sewageesakal
Updated on

Nashik News : उच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या अनुषंगाने सातपूर विभागातील नदीलगत व नाल्यालगत मुख्य मलवाहिका तसेच ब्रांच लाईन टाकण्याचा निर्णय मलनिस्सारण विभागाकडून घेण्यात आला आहे. नंदिनी नदी व नाल्यांमध्ये सोडण्यात येणारे सांडपाणी अडवून ते वाहून नेण्यासाठी नदीच्या किनारी मुख्य मलवाहिका टाकली जाणार आहे. त्यासाठी जवळपास १ कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली. (Main sewer along river to block sewage )

२०१२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात गोदावरी गटारीकरण विरोधी मंचाकडून जनहित याचिका दाखल करण्यात आली. याचिकेच्या अनुषंगाने महापालिकेला प्रदूषणमुक्त करण्यासाठी विशेष सूचना केल्या आहे. त्याअनुषंगाने मलनिस्सारण विभागाने सातपूर विभागातील नंदिनी नदी तसेच अन्य नाल्यांमध्ये मिसळणारे सांडपाणी अडविण्यासाठी मलवाहिका टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्रेप सिटी, चिखली, सोमेश्वर, बारदान फाटा व गंगापूर या नाल्यांना जोडणारे उपनाले जसे महेंद्र हरियाली, बळवंतनगर, भवर मळा, कार्बन, कान्होळ, सती आसरा, हॉटेल जिंजर मागील नाला, गोरक्षनाथ, शिवम टॉकीज, जय बजरंग, महिंद्र, त्र्यंबक उतार, हॉटेल डेमॉक्रसी , समृद्धनगर नाला, पिंपळगाव बहुला या उपनाल्यालागत सांडपाणी वाहून नेण्यासाठी मलवाहिका टाकल्या आहेत. (latest marathi news)

River sewage
Nashik News : स्वेटरविक्रेत्या तिबेटींनी धरली उच्च शिक्षणाची कास; नाशिकमधील तिघे झाले डॉक्टर

सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये ड्रेनेजलाइन नाही. संबंधित मुख्य आणि त्यांच्या उपनद्यांमधून सांडपाणी वाहते या नाल्यांमधून वाहणारे सांडपाणी नंदिनी व गोदावरीमध्ये मिसळत असल्याने प्रदूषणास हातभार लागतो हे सांडपाणी नद्यांमध्ये मिसळून नये म्हणून मुख्य मनवाहिकेमध्ये सांडपाणी वळविले आहे.

मुख्य मलवाहिकावरील चेंबर नाल्याजवळ असल्याने पुरामुळे ड्रेनेज पाइपलाइन गाळ, माती व कचरा जाऊन चेंबर बंदिस्त होतात. चेंबर तुटतात, त्यामुळे प्रदूषणात वाढ होते व उग्र वास येत असल्याच्या तक्रारी वारंवार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सांडपाणी अडविण्यासाठी मलवाहिका टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

River sewage
Nashik News : जिल्ह्याचा 34 हजार 800 कोटींचा पत आराखडा; जिल्हाधिकारी शर्मा यांच्या हस्ते पुस्तिकेचे उद्‌घाटन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.