देवळा : कसमादे पट्ट्यातील विविध ठिकाणी सदोष बियाण्यामुळे व अतिपावसामुळे पिकांवर बुरशीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मक्याचे पीक करपल्याने बळीराजा हतबल झाला आहे. शेतातील तुऱ्यावर असलेल्या व कणीसवाढीच्या काळात हिरव्यागार पिकाचे अशा पद्धतीने नुकसान झाल्याने हा बियाण्याचा दोष की वातावरणाचा याबाबत शेतकऱ्यांत संभ्रम आहे. खरीप हंगामातील हे मोठे नुकसान असून, अशा नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करीत भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. (Maize Crops destroyed Due to Fungus Infestation at Kasmade)