मालेगाव : येथील फळफळावळ बाजारात फळांची आवक घटली आहे. त्यामुळे येथे फळांच्या किमती वाढल्या आहेत. डाळिंबाला सर्वाधिक भाव मिळत आहे. बाजारात सफरचंद, पेरू, पपई, डाळिंब, मोसंबी, चिकू ही फळे विक्रीस येत आहे. सर्वात कमी चिकूची आवक आहे. मात्र, डाळिंबाला घाऊक बाजारात दोनशे रुपये, तर किरकोळ बाजारात अडिचशे रुपये किलोपर्यंत भाव मिळत आहे. (Maize Crops Due to Fungus Infestation)