येवला : विकासाचा मुद्दा अन मराठा-ओबीसी पडद्याआडच्या संघर्षातून अनेक गावे इकडेतिकडे झुकले परिणामी ग्रामीण भागात सरासरी मतदान राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ व माणिकराव शिंदे यांना फिफ्टी-फिफ्टी झाल्याचे दिसते. मात्र, येवला, लासलगाव, विंचूर, अंदरसुल, नगरसुल, राजापूर या गावात घड्याळाची टिकटिक वाजली अन् येथे मिळालेल्या मताधिक्यांमुळेच भुजबळ निवडणूक आखाड्यात तरले.