Nashik News : मनमाड-कोपरगाव रस्ता चौपदरी करा; मंत्री भुजबळ यांची नितीन गडकरींकडे मागणी

Nashik News : मनमाड-येवला कोपरगाव रस्त्याच्या चौपदरीकरणास मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
Traffic congestion on Manmad-Kopargaon road in Yeola has become routine.
Traffic congestion on Manmad-Kopargaon road in Yeola has become routine.esakal
Updated on

येवला : वाढत्या वाहतुकीमुळे सतत वाहतूक कोंडी होऊन मोठी समस्या निर्माण होत असल्याने भारतमाला परियोजनेंतर्गत येवला बायपाससह मनमाड-येवला कोपरगाव रस्त्याच्या चौपदरीकरणास मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. (Make Manmad Kopargaon road four lane Minister Bhujbal demands to Nitin Gadkari)

नॅशनल हायवे ७५२ जी हा इकॉनॉमिक कॉरिडॉर नॅशनल हायवे ५२ आणि नॅशनल हायवे ६१, नॅशनल हायवे १६० सह जोडणारा सर्वात जवळचा उत्तर-दक्षिण महामार्ग आहे. तसेच, नॅशनल हायवे ७५२ जी हा उत्तर भारतापासून शिर्डीला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग आहे. नॅशनल हायवे ७५२ एचच्या शिवूर ते येवला २९.१० किलोमीटर विभागाच्या उन्नतीकरणासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने १८१ कोटी मंजूर केले.

हा मार्ग येवला शहरातील नॅशनल हायवे ७५२ जी ला फत्तेबुरुज नाका जंक्शन येथे मिळतो. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर वरून नाशिककडे जाणारी वाहतूक शिर्डीच्या रस्त्यावर नॅशनल हायवे ७५२ जी वरील फत्तेबुरुज नाका येथे विलीन झाल्याने शहरात प्रचंड गर्दी होऊन वाहतूक मंदावली असून, यामध्ये तातडीने हस्तक्षेपाची गरज आहे.

शहरातून जाणाऱ्या अरुंद रस्त्यामुळे शिर्डी आणि पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना एका तासापेक्षा जास्त वेळ लागतो. याठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीसह प्रमुख बाजारपेठ आहे आणि महामार्गालगत राज्य परिवहन बस डेपोदेखील आहे. जानेवारी २०२१ ते मे २०२२ पर्यंत नगरसूलमधून ४४०, तर येवला व लासलगावमधून प्रत्येकी १०० रेल्वे मालवाहतूक करण्यात आली. (latest marathi news)

Traffic congestion on Manmad-Kopargaon road in Yeola has become routine.
Nashik ZP News : सुपर फिफ्टीच्या निधीसाठी ‘नियोजन’ला साकडे; जिल्हा परिषद प्रशासनाकडून 2 कोटींची मागणी

यामध्ये कांदा, द्राक्षे, टोमॅटो, खरबूज या पिकांची चितपूर, फतुहा, आगरतळा, नौगाचिया, छपरा, बैहाता, धुपगुरी, संकरे, डंकुनी, गौरमालदा, गुवाहाटी, न्यू जलपाईगुडी, दिल्ली येथे वाहतूक करण्यात आली. या सर्व किसान रेल मधील कांदा व इतर शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटमध्ये मधून जातो.या मालाची वाहतूक नॅशनल हायवे ७५२ जी ओलांडून रेल्वे स्टेशनवर केली जाते त्यामुळे या रस्त्यावर प्रचंड वाहतुकीची कोंडी होते.

तसेच, येवल्यातील कांदा अनकाई येथे गुड्स शेड निर्मितीनंतर नॅशनल हायवे ७५२ जी मार्गे पोहचवला जातो. या रस्त्यावरून २०२१- २२ मध्ये ७३ टक्के मालवाहतूक केली होती. यामध्ये ३५० किमीपेक्षा कमी अंतरावर ८२ टक्के, तर ६०० किमी अंतरासाठी ६२ टक्के मालवाहतूक झाली आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पामध्ये २२ लाख कोटी गुंतवणुकीसाठी २०३१-३२ पर्यंत ३० हजार ६०० किलोमीटरच्या गुंतवणुकीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मागितली आहे. यामुळे ४ हजार किलोमीटर राष्ट्रीय महामार्गांची वाहतूक कोंडी कमी होणार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.

Traffic congestion on Manmad-Kopargaon road in Yeola has become routine.
Nashik Police: ॲकॅडमीच्या संचालकांना पोलिसांचा दणका! जल्लोष भोवला; दोघांविरोधात मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा

कनेक्टिव्हिटीचा फायदा

येवला बायपास हा प्रस्तावित पीएम मित्रा सिल्क पार्क आणि औद्योगिक वसाहत यांना राष्ट्रीय महामार्ग कनेक्टिव्हिटीचा स्पर्धात्मक लाभ देऊन सामाजिक, आर्थिक विकासाचा प्रसार करण्यास उपयोगी ठरणार आहे. अलिकडेच मनमाड रेल्वे ओव्हर ब्रीजपर्यंतचा मुख्य रस्ता कोसळल्याने या महामार्गावरील वाहतूक नांदगावमार्गे वळवण्यात आली.

ज्यामुळे उत्तर-दक्षिण साखळी पुरवठा विस्कळीत झाला होता. सदर परिस्थितीत नॅशनल हायवे ७५२ जी च्या मनमाड-येवला-कोपरगाव सेक्शनचे महत्व ठळकपणे जाणवले. त्यामुळे येवला बायपाससह मनमाड-येवला-कोपरगाव रस्त्याचे चौपदरीकरण करण्यास मंजुरी देण्यात यावी, असे मंत्री भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Traffic congestion on Manmad-Kopargaon road in Yeola has become routine.
Nashik ZP News : शिष्यवृत्तीचा टक्का वाढीसाठी शिक्षण विभाग सरसावला; जिल्हा परिषद शाळांमध्ये आतापासूनच घेणार सराव परीक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.