Nashik Crime News : मालेगाव मच्छीबाजार भागातील गोळीबाराला अवैध धंद्यातील वादाची किनार

Nashik News : शहरातील मच्छी बाजार- कमालपुरा भागातील गोळीबार प्रकरणाला दोन अवैध धंद्यातील व्यावसायिकांच्या वादाची किनार आहे. त्यामुळे पोलिस त्या दिशेने तपास करीत आहेत.
Crime
Crime esakal
Updated on

मालेगाव : शहरातील मच्छी बाजार- कमालपुरा भागातील गोळीबार प्रकरणाला दोन अवैध धंद्यातील व्यावसायिकांच्या वादाची किनार आहे. त्यामुळे पोलिस त्या दिशेने तपास करीत आहेत. गांजा विक्रीचा अवैध व्यवसाय करणाऱ्या दोघांच्या वादात गोळीबारात भांडण सोडविण्यास गेलेला तरुणच जखमी झाला. (malegaon firing case in city fish market area is related to dispute between two illegal businessman)

या भागात वृध्दाच्या अंत्ययात्रेसाठी (दफनविधी) तयारी सुरु असतांना याच भागात राहणाऱ्या मसूद कमल खान उर्फ मसूद गांजावाला (वय २८) व फिरोज गांजावाला या दोघांच्या गटात बाचाबाची सुरु झाली. बाचाबाचीचे पर्यावसन मोठ्या वादात होत असल्याचे पाहून हे भांडण सोडविण्यासाठी शेख शफीक युसूफ उर्फ मुन्ना ड्रायव्हर हा आला.

त्याने वडिलांचे निधन झाले आहे. येथे वाद का करता असे सांगत भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मसूद गांजावाला याने फिरोज गांजावाल्यावर गोळीबार केला असता फिरोजऐवजी गोळी शफीक शेख याला लागली. (latest marathi news)

Crime
Jalgaon Crime News : मोहाडी दगडफेक प्रकरण; सरपंचाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

दोन अवैध व्यावसायिकांच्या वादात निरप्राध तरुण भरडला गेला. शफीक शेख याच्या पोटात गोळी लागल्याने शफीक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शफीकची प्रकृती अत्यवस्थ आहे. शहरात कुत्ता गोळीपाठोपाठ गुटखा व अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्या वेगवेगळ्या टोळ्या कार्यरत आहेत.

त्यांच्यात वैमनस्य आहे. यातूनच हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी मसुदला अटक करतांनाच त्याच्याजवळून २५ हजार रुपये किंमतीचे सिलव्हर रंगाचे पिस्तुल व ९ एमएमची एक रिकामी काडतुस, पुंगळी जप्त केली आहे. पोलिस निरीक्षक संजय सानप तपास करीत आहेत.

Crime
Nagpur Crime : अभियंत्याची तीन कोटींनी फसवणूक ; पती-पत्नीसह दहा जणांवर गुन्हे दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.