Nashik News : मालेगावचा उड्डाणपूल बनला वाहनतळ; बेशिस्त वाहनांमुळे वाहतूक कोंडीची नवीन समस्या

Nashik News : उड्डाणपुलाच्या खाली वाहनांनी ताबा घेतला आहे. वाहने लावल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
Private vehicles parked under the flyover here
Private vehicles parked under the flyover hereesakal
Updated on

मालेगाव : येथील उड्डाण पूल सुरु होण्याच्या प्रतिक्षेत आहे. उड्डाणपुलाला रंगरंगोटीच काम करण्यात येत आहे. उड्डाणपुलाच्या खाली वाहनांनी ताबा घेतला आहे. वाहने लावल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्‍ती उड्डाणपुलाचे रंगरंगोटीच काम सुरु आहे. येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. उड्डाणपुलाखाली चारचाकी वाहने, भिकारी, व्यावसायिकांनी कब्जा करून ठेवला आहे. त्यामुळे दुतर्फा वाहतूक कोंडी होते. (Malegaon flyover turned parking traffic problem increase )

जवळच जेएटी व एटीटी महाविद्यालय आहे. येथे प्रसिद्ध असलेला भंगार बाजार आहे. भंगार बाजारात खरेदीसाठी शनिवार व रविवारी मोठी गर्दी असते. तसेच या भागात मच्छी बाजार आहे. शाळा सुटण्याच्या वेळेस मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. तसेच या भागात नवीन बसस्थानक असून बसस्थानकाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात रिक्षा लावलेल्या असतात. बसस्थानक व उड्डाणपुलाच्या परिसरात अनेक खाद्य पदार्थांच्या हॉटेल आहेत. हॉटेलमध्ये जेवणासाठी व चहा पिण्यासाठी आलेले नागरिक रस्त्याच्या कडेला वाहने लावतात. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होते. (latest marathi news)

Private vehicles parked under the flyover here
Nashik Crime News : नाशिकमधून चोरलेल्या कारची परराज्यात विक्री; गुन्हेशाखेने आवळल्या संशयिताच्या मुसक्या

तसेच कुसुंबा रस्त्यावरून काही प्रमाणात अवजड व नवीन बसस्थानकातून सुटणाऱ्या व येणाऱ्या बस येतात. रस्त्यावर वाहने उभी केल्यामुळे बसचालकांना देखील बस चालविताना मोठी कसरत करावी लागते. नवीन बसस्थानक ते दरेगाव, नवीन बसस्थानक ते मोसम पूल चौकापर्यंत हीच परिस्थिती आहे. येथे शाळकरी मुलांचा जाण्यायेण्याचा मार्ग आहे. या ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याचीच होते. महापालिका प्रशासनाने येथे गतिरोधक व वाहतूक शाखेतर्फे कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी. जेणेकरून या भागात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार नाही.

''महापालिकेने ऐतिहासिक उड्डाणपुलाचे काम सुरु ठेवले आहे. उड्डाणपुलाच्या विकास कामात जाणीवपूर्वक दिरंगाई होत आहे. उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले तरी रस्ते जोड झाले नाहीत. उड्डाणपुलाखाली आवश्‍यक कॉंक्रीटीकरण झाले नसल्याने त्या ठिकाणी खासगी वाहनांचा व व्यावसायिकांचा वावर वाढला आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने सर्वसामान्य नागरीकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात वाहतूक शाखा, महापालिका आयुक्तांनी संयुक्त कारवाई करावी.''- निखिल पवार (सदस्य, आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती

Private vehicles parked under the flyover here
Nashik News : भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत शासकीय विभागांविषयी सर्वाधिक तक्रारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.