Success Story : आई-बापाच्या कष्टाला उत्तुंग यशाचे कोंदण! मिनाक्षीने दहावीत मिळवले 95.20 टक्के गुण

Nashik News : कलेक्टर पट्टा भागातील मिनाक्षी मोरे हिने दहावीत ९५.२० टक्के गुण मिळवून शाळेत तृतीय येत आई- बापाच्या कष्टाला चारचॉंद लावले.
Father Sandeep, mother Asha congratulating Meenakshi More.
Father Sandeep, mother Asha congratulating Meenakshi More.esakal
Updated on

मालेगाव : ‘लेक मायेचा पाझर, लेक यशाचा निर्झर’ अशाच लेकींच्या कौतुकास्पद कामगिरीने कुटुंबाचे नाव उंच शिखरावर जात असते. कलेक्टर पट्टा भागातील मिनाक्षी मोरे हिने दहावीत ९५.२० टक्के गुण मिळवून शाळेत तृतीय येत आई- बापाच्या कष्टाला चारचॉंद लावले. मिनाक्षी मोरे ही अल्पबचत प्रतिनिधी असलेल्या संदीप मोरे यांची मोठी कन्या. (Malegaon Meenakshi More secure 95 percent in 10th)

तिने पहिली ते चौथीपर्यंत सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेत, तर पाचवीपासून दहावीपर्यंत कर्मवीर या. ना. जाधव विद्यालयात शिक्षण घेतले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने पायी, तर कधी सायकलीने शाळा व क्लास करून शिक्षणाचा मार्ग यशस्वी केला. आई आशा मोरे या स्वयंपाकी व कुरडया-पापड करण्याचे मजुरीने काम करतात.

आजपर्यंत मोरे कुटुंबातील असे यश कोणीही मिळवले नसल्याचे आजी मखमलाबाई मोरे यांनी सांगितले. लहानपणापासूनच मिनाक्षीने आई-बापाच्या कष्टाचा संघर्षाची जाणीव असल्याने घर कामात मदत करीत आपल्या अभ्यासात लक्ष केंद्रित केले. चित्रकलेची आवड असून, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन कला जोपासते. (latest marathi news)

Father Sandeep, mother Asha congratulating Meenakshi More.
Nashik News : विभागीय आयुक्तपदासाठी अधिकाऱ्यांची ‘फिल्डिंग’

मेहंदी काढण्याचा छंद असून, पुढील शिक्षणासाठी मेहंदीच्या माध्यमातून आर्थिक आधार कसा मिळेल, यावरही लक्ष देणार असल्याचे मिनाक्षी म्हणाली. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुनील वडगे, सचिव ॲड. जे. आर. अहिरे, प्राचार्य हर्षिता अहिरे, पर्यवेक्षक सुभाष धोडंगे यांनी सत्कार केला.

"प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून ध्येय बाळगून अभ्यास केल्यास यश हमखास मिळते. आजी, आई, वडील व शिक्षकांचे मार्गदर्शन दिशादर्शक आहे. वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊन ‘चार्टर्ड अकांऊट’ क्षेत्रात करीअर करायचे आहे." - मिनाक्षी मोरे, विद्यार्थीनी

Father Sandeep, mother Asha congratulating Meenakshi More.
Nashik Lok Sabha Election : निकालाच्या उत्कंठेने नियोजनाची आखणी; उत्तर महाराष्ट्रातील जागांकडे लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.