Malegaon MSRTC Depot : उत्पन्नावर आघाडीवर असूनही मालेगाव आगाराला समस्यांचा विळखा!

Latest Nashik News : खासगी वाहनांनी बसस्थानकाच्या बाजूला जणू अतिक्रमण केले आहे. शौचालय व प्रसाधनगृहाची दुरवस्था आहे. आगाराने नुकत्याच पाच बस स्क्रॅप केल्या आहेत. मालेगावकरांसाठी मात्र नवीन बारा बस उपलब्ध झाल्या आहेत.
Beggars sitting at Malegaon Bus Stand, Bus Stand Help Desk Without Police & Concrete Bus Stand Looks Beautiful
Beggars sitting at Malegaon Bus Stand, Bus Stand Help Desk Without Police & Concrete Bus Stand Looks Beautifulesakal
Updated on

Malegaon MSRTC Depot : मुंबई, पुणे, इंदूर, सुरत या चारही शहरांचे मालेगावहून तीनशे किलोमीटर अंतर आहे. उत्पन्नात आघाडीवर असलेल्या बसस्थानकाला विविध समस्यांनी घेरले आहे. प्रवाशांसाठीच्या बाकड्यांचा भिकारी व मनोरुग्णांनी ताबा घेतला आहे. तर खासगी वाहनांनी बसस्थानकाच्या बाजूला जणू अतिक्रमण केले आहे. शौचालय व प्रसाधनगृहाची दुरवस्था आहे. आगाराने नुकत्याच पाच बस स्क्रॅप केल्या आहेत. मालेगावकरांसाठी मात्र नवीन बारा बस उपलब्ध झाल्या आहेत. (Malegaon depot problems)

शहरात नविन व जुने असे दोन बसस्थानक आहेत. येथून रोज ६५ बस धावतात. पुणे, मुंबई, सुरत, संभाजीनगर या मोठ्या शहरांकडे लांब पल्ल्याच्या बस धावतात. आगारात ४०३ कर्मचारी आहेत. आगारातून ग्रामीण भागात २१ बस मुक्कामी जातात. त्यामुळे चालक, वाहक असे ४२ कर्मचारी त्या-त्या बसमध्येच मुक्कामी असतात.

तसेच बाहेरगावाहून मुक्कामी येथे येणाऱ्या बसच्या चालक व वाहकांसाठी सुविधा आहेत. मालेगाव आगाराने जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यात २४.५८ लाख रुपये नफा मिळविला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नातून बसस्थानकाचे कॉंक्रीटीकरण व चेहरा-मोहरा बदलण्यात आला.

बाके भिकाऱ्यांकडून हायजॅक

येथील दोन्ही बसस्थानकात स्वच्छतेचा प्रश्‍न नेहमीच ऐरणीवर राहिला आहे. भिकारी व मनोरुग्ण प्रवासी बसण्याच्या बाकांवर झोपलेले असतात. बसस्थानकात दोन-तीन कचरा पेट्या आहेत. असे असले तरी बहुसंख्य प्रवासी खाद्यपदार्थ खाऊन कागद, पिशव्या तेथेच फेकतात. तंबाखू व गुटखा खाऊन बसस्थानकाचे कोपरे लाल झाले आहेत. शौचालय परिसरात दुर्गंधी आहे.

बारा नवीन बस दाखल

येथील नवीन बसस्थानकातून ३७० तर जुन्या बसस्थानकातून १०० अशा एकूण ४७० फेऱ्या होतात. यासाठी बसची संख्या पुरेशी असल्याचे सांगण्यात आले. या महिन्यात पाच बस स्क्रॅपला देण्यात आल्या. तसेच काही महिन्यापूर्वी नवीन १२ बस दाखल झाल्या आहेत. एकूण ६५ बस असून १० बस बीएस-६ व दोन हिरकणी बस आहेत. मालेगाव आगारातून रोज १९ हजारावर प्रवासी प्रवास करतात.

खासगी वाहनांचा विळखा

येथे नवीन बसस्थानकात वाहनांसाठी पार्किंग आहे. असे असले तरी बसस्थानकाच्या दोन्ही बाजूंना खासगी वाहनांनी विळखा घातला आहे. दुचाकी व चारचाकी वाहने दोन्ही बाजूला लावली जातात. प्रवाशांना सोडण्यासाठी दुचाकी, चारचाकी व रिक्षा थेट बसस्थानकात घुसतात.

एकावेळी बसची गर्दी झाल्यास बस स्थानकावर लावताना चालकांना कसरत करावी लागते. आगारात प्रवाशांना बसण्यासाठी सिमेंटची बाके तयार करण्यात आली आहेत. या बाकांवर भिकारी, मनोरुग्ण व काही नशेखोर नेहमी झोपलेले असतात. त्यामुळे अनेक प्रवाशांना उभेच राहावे लागते.

पोलिसांविना मदत केंद्र

नवीन बसस्थानकात सुरक्षेच्या दृष्टीने २४ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. असे असले तरी गर्दीचा फायदा घेऊन चोरटे प्रवाशांचे दागिने व पैसे लांबवितात. बसस्थानकात पोलिस चौकी व पोलिस मदत केंद्र असून पोलिस कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा आहे. बसस्थानकात कायमस्वरूपी किमान दोन पोलिस कर्मचारी कार्यरत असावेत यासाठी आगार व्यवस्थापनाने आयशानगर व शहर पोलिसांकडे पत्रव्यवहार केला आहे. पोलिस कार्यरत झाल्यास भुरट्या चोऱ्यांना आळा बसेल. (latest marathi news)

Beggars sitting at Malegaon Bus Stand, Bus Stand Help Desk Without Police & Concrete Bus Stand Looks Beautiful
Yeola MSRTC Depot: जुन्या बसमुळे लागली दृष्ट! 5 बस स्क्रॅपच्या वाटेवर, सर्व बसचे आयुर्मान झाले 10 वर्षांचे; नव्या बसची प्रतीक्षा

प्रवाशांना बसमध्येच मिळतेय थंड पाणी

येथील नवीन बसस्थानकात श्री राजस्थान मंडळातर्फे २६ वर्षापासून पाणपोई सुरू आहे. येथे थंड पाण्यासाठी चार कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे निरंतर सेवा करण्यात राजस्थानी मंडळ अग्रेसर आहे. याशिवाय राजस्थानी मंडळाच्या जलसेवा समितीतर्फे मालेगावच्या कडक उन्हात फेब्रुवारी ते मे या चार महिन्यात प्रवाशांना बसमध्ये जाऊन व बसच्या बाहेर उभे राहून थंड पाणी दिले जाते. अशा स्वरूपाची सेवा महाराष्ट्रात केवळ मालेगावातच दिसून येते.

आकडे बोलतात....

एकूण बस - ६५

रोजच्या बसफेऱ्या - ४७०

वाहक - १५५

चालक - १५१

प्रशासकीय - ३८

कार्यशाळेतील कामगार - ५७

स्वच्छता कर्मचारी - २

स्वच्छतेचा दर्जा - ब

उत्पन्नाचा दर्जा - अ

"बसस्थानकात नियमित स्वच्छता होत नाही. येथे ठिकठिकाणी प्लास्टिक कचरा साचलेला असतो. अनेक भिकारी येथे झोपलेले असतात. त्यामुळे प्रवाशांना त्रास होतो. महिलेचा सुरक्षेचा विषय महत्त्वाचा आहे. येथे कुठेही पोलिस दिसत नाही. तसेच सातत्याने चोरीचे प्रकार घडतात. प्रवासी हितासाठी सुरक्षाकवच मजबूत करावे."- भारती चितळकर, प्रवासी

"आगाराचे पूर्ण कॉंक्रीटीकरण झाले आहे. काही दिवसात येथे नवीन प्रशासकीय इमारतीचे काम सुरु होणार आहे. मालेगाव आगार उत्पन्नाच्या बाबतीत जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आहे. प्रवाशांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. नवीन व जुन्या बसस्थानकात कायमस्वरूपी पोलिस नेमावेत यासाठी आगारातर्फे पोलिसांना पत्र दिले आहे."

- योगेश कोल्हे, आगार व्यवस्थापक, मालेगाव

Beggars sitting at Malegaon Bus Stand, Bus Stand Help Desk Without Police & Concrete Bus Stand Looks Beautiful
Nashik News: सरपंच-उपसरपंचांना निवडणुकीपूर्वीच गिफ्ट! मानधन वाढीमुळे जिल्ह्यातील गावकारभाऱ्यांना मिळणार सुमारे दीड कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.