मालेगाव : शहरात जुन्या वस्तु दुरुस्ती करण्यात मालेगावकर माहीर आहेत. येथे जुने शॉकप, टीव्ही, घड्याळ, कुलर, गिझर, मोबाईल, मिक्सर यासह विविध वस्तु दुरुस्ती केली जाते. येथे टाकाऊ वस्तु पासुन टिकाऊ वस्तु तयार केले जातात. शहरातील जुन्या वस्तु विक्री करण्याऱ्या व्यापाऱ्यांना मुंबईजवळ असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात जुन्या वस्तु विक्रीस येतात. भंगारात येणाऱ्या वस्तुंमध्ये संसार उपयोगी वस्तुंची संख्या मोठी असते. जुन्या फ्रिज व वाशिंग मशिनचा मालेगावी बोलबाला आहे. (Nashik malegaon old fridge demand increased news)
येथील भंगार बाजारात जुन्या वस्तू विक्रीला येतात. शहरात मोठ्या प्रमाणात मजूर, कामगार वर्ग राहत असल्याने जुन्या वस्तु खरेदी करुन ते गुजरन करतात. येथे जुना फ्रिज दुरूस्ती करण्याचा फंडा आहे. मुंबई येथे फ्रिज स्क्रॅपच्या हिशोबाने विकतात. येथील व्यापारी मुंबई येथून फ्रिज लॉटमध्ये घेतात. येथे अवघ्या सहा हजाराला फ्रिज मिळतो सोबत सहा महिने वॉरंटी दिली जाते.
१९९५ पासून फ्रिजची दुरुस्ती केली जाते. फ्रिज मध्ये सिंगल व डबल डोअर फ्रिजला मोठी मागणी असते. फ्रिज दुरुस्तीची येथे ३५० दुकाने आहे.या दुकानात सुमारे पाच ते सहा हजार नागरिक काम करतात. फ्रिजमध्ये विजी, सिंगल व डबल डोअर, डिप फ्रिज, एसी कॉऊटंर यासह अनेक प्रकार आहे. दुकानदार शितपेये ठेवण्यासाठी काचेचे दरवाजा असलेल्या फ्रिजची मागणी आहे.
स्वस्तात मस्त मिळण्याऱ्या फ्रिज घेण्याकडे नागरिकांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात मालेगावचे तापमान आघाडीवर असते. शहराबरोबर फ्रिज दुरुस्ती करुन जळगाव, पाचोरा, यवतमाळ, खामगाव, बुलढाणा, अहमदनगर,अकोला, घाटनांद्रा याविविध भागात फ्रिज विक्रीला जातात. ऊन्हाळ्यात येथे फ्रिजच्या मागणीत दुप्पटीने वाढ होते. (latest marathi news)
येथे एलजी कंपनीच्या फ्रिजला मागणी आहे. मार्च ते जूनपर्यंत फ्रिज विक्री होते. फ्रिज बरोबर येथे वाशिंग मशिनही दुरुस्ती करुन विक्री होतात. नवीन फ्रिज व वॉशिंग मशीनच्या किंमती दहा हजारापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे असंख्य नागरिक जुने फ्रिज आवर्जून खरेदी करतात. येथे वॉशींग मशीनही चार ते साडेचार हजाराला मिळतो.
"तीन दशकापासून फ्रिज विक्रीचा व्यवसाय करीत आहे. यंदा कमी किंमतीत फ्रिज मिळतो. शंभरमधून एक-दोन टक्के फ्रिज खराब निघतात. काही ग्राहकांकडे गेल्या दशकभरापासून विक्री केलेले फ्रिज वापरत आहेत. त्यामुळे जुन्या फ्रिजकडे अनेक नागरीकांचाही कल वाढतांना दिसत आहे." - मोहम्मद बिलाल, संचालक, सोनु टू, मालेगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.