मालेगाव : शहरीकरणाच्या वाढत्या वेगाबरोबरच शहरातील दोन- चारचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, मात्र जनतेते अजूनही वाहतूक नियम पाळण्यांबाबत उदासिनता दिसून येत आहे. येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे वर्षभरात दुचाकी, चारचाकी, अजवड वाहने यासह विविध वाहनांवर कारवाई करण्यात आली.
यात सर्वात जास्त विना हेल्मेट (Helmet) दुचाकीस्वारांचा समावेश आहे. वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने वर्षभरात १ कोटी ८३ लाख ५२ हजाराची दंडात्मक कारवाई केली. या कारवाईतून वाहनचालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. कारवाई होत असली तरी अनेक वाहनचालक अजूनही शिस्तीपासून कोसो मैल दूर आहेत. (Nashik Malegaon people not using helmet marathi news)
मालेगावात शहरात जो वाहन चालवू शकतो, तो आलम दुनियेत कुठेही दुचाकी- चारचाकी चालवू शकतो असे गमतीने म्हटले जाते. अर्थात हे खरेच नियमानुसार वाहन चालविणाऱ्यांबाबत आहे, कारण इथले वाहनचालक इतके बेशिस्त आहेत की त्यांना सावरत वाहनचालक कधी सराईत वाहनचालक होता हे त्यालाही समजत नाही.
येथे प्रत्येक जण आपल्या मर्जीने वाहने हाकतात. यात विनापरवाना, विनाहेल्मेट, ट्रिपल सीट, विना वाहनाची कागदपत्रे, विरुद्ध बाजूने वाहन चालविणे असे प्रकार येथे नित्याचे आहेत. दुचाकी चालकांमध्ये जनजागृतीसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शहर व परिसरात शाळा व महाविद्यालयांमध्ये हेल्मेट व रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती मोहीमही राबविण्यात आल्या.
अपघात रोखण्यासाठी आरटीओ कार्यालयातर्फे विविध उपक्रमही राबविले गेले आहे. २०२३ मध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या मालेगाव, सटाणा, कळवण, देवळा, नांदगाव, चांदवड या भागातील ४ हजार ७६९ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
यात हेल्मेट नसणे, वाहन चालवतांना मोबाईलवर बोलणे, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश हॉर्न, विना ड्रायव्हिंग लायसन्स, इन्शुरन्स, पियुसी, मटगार्ड तसेच चारचाकीत सीटबेल्ट, बुलगार्ड, बंपर, स्टिकर, कलर, रिफ्लेकटर, ओव्हरलोड, योग्यता प्रमाणपत्र नसणे, आरसी नुतनीकरण न करता वाहन चालविणे, वाहन परवाना निलंबित असणे यासह विविध वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. आरटीओतर्फे पाचशे रुपयापुढे दंड आकारला जातो. (Latest Marathi News)
वर्षभरात अशी झाली कारवाई
वाहन परवाना निलंबन - १०५४
योग्यता व फिटनेस प्रमाणपत्र नसणे - ४४१
ओव्हरलोड वाहनावर केलेली कारवाई - ४९०
विना हेल्मेट - २३०३
विना रेफिलेक्टर (रेडिअम) - २४९
इतर दंडात्मक केलेली कारवाई - २३२
- एकूण कारवाई - ४७६९
"वाहनचालकांनी तपासणीसाठी कागदपत्रे सोबत ठेवणे आवश्यक आहे. दुचाकी चालविताना हेल्मेट अवश्य वापरावे. विरुद्ध बाजूने वाहने चालवू नये. ट्रिपल सीट, मोबाईलवर बोलणे टाळावे. वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करुन वाहनचालकांनी दंडात्मक कारवाई टाळावी."
- विनोद जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मालेगाव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.