Nashik News : डासांमुळे मालेगावकर त्रस्त! अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर

Nashik News : डासांची उत्पती वाढल्यामुळे बहुसंख्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेतर्फे डास प्रतिबंधीत औषधांची फवारणी व्हावी, अशी मागणी होत आहे.
mosquitoe
mosquitoeesakal
Updated on

मालेगाव : मालेगाव शहर परिसरात दमदार पावसाने अद्याप हजेरी लावली नसल्याने येथे रोगराई वाढली आहे. येथे मोकळ्या भुखंडावर झाडे वाढली आहेत. तसेच, गटारीत प्लॅस्टिक कचरा असल्याने पाणी निचरा होत नाही. त्यामुळे येथे डासांची उत्पती वाढली आहे. बहुसंख्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेतर्फे डास प्रतिबंधीत औषधांची फवारणी व्हावी, अशी मागणी होत आहे. (Malegaon people suffering due to mosquitoes)

शहरात मोठ्या प्रमाणात गटारीत कचरा असतो. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. पावसाळ्यात डासांची संख्या वाढली आहे. येथील नागरीकांना दिवसा बसणे देखील जिकरीचे बनले आहे. मोकळ्या भुखंडांवर कचरा, झाडे-झुडूपे वाढल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. नागरीकांना सायंकाळी घराच्या बाहेर बसणेदेखील मुश्‍कील झाले आहे.

येथील कलेक्टरपट्टा, सावतानगर, संगमेश्‍वर, श्रीरामनगर, द्याने, विजयनगर, किल्ला झोपडपट्टी, कॅम्प, गवळी वाडा, कृषी नगर, दौलती शाळेच्या पाठीमागील भाग, रमजानपुरा, आयशानगर, म्हाळदे, दरेगाव, पवारवाडी यासह अनेक भागांमध्ये डासांचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेतर्फे येथे डास प्रतिबंधीत औषधांची फवारणी करावी. तसेच, मोकळ्या भुखंडावरील काटेरी झुडूपे, गवत काढावे, अशी मागणी होत आहे. (latest marathi news)

mosquitoe
Mosquito liquid Side Effects : डासांना पळवून लावणारी लिक्विड मशीन आरोग्यासाठी ठरतेय धोकादायक, काळजी घ्या नाहीतर...

डासांपासून बचावासाठी लिंबाच्या पाल्याचा वापर

येथे डासांपासून बचाव करण्यासाठी बहुसंख्य नागरीक डास प्रतिबंधक अगरबत्ती, कॉईल, लिक्विड वापरत आहे. मध्यमवर्गीय नागरीक लिंबाच्या पाल्याचा वापर करीत आहे. लिंबाच्या पाल्याचा धूर कडू असल्याने डास काही प्रमाणात कमी होतात. त्यामुळे झोपडपट्टी भागात लिंबाच्या पाल्याचा वापर तसेच यंत्रमागातून निघालेली खराब कापूसचा धूर केल्याने काही प्रमाणात डास पळून जात असल्याचे नागरिकांनी सांगितले

"महापालिकेच्या स्वच्छता विभागाने शहरात डासप्रतिबंधक औषधांची फवारणी करण्यासंदर्भात वेळोवेळी सांगावे लागते. त्यानंतरच काही दिवसानंतर दखल घेतली जाते. वार्षिक नियोजनात हा विषय राहत नाही का? वेळोवेळी तक्रार का करावी लागते."

- समीर अहमद, संचालक, जोहान फाऊंडेशन मालेगाव

"महापालिकेतर्फे शहरात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी मोहिम राबवावी. आरोग्य विभागाने दखल घेऊन शहरात मोहीम राबवावी. जेणेकरुन नागरीकांना मोठ्या प्रमाणात डासांपासून दिलासा मिळेल."- दिनेश गवळी, सामाजिक कार्यकर्ता, गवळीवाडा

mosquitoe
Mosquitoes Remedies : घरात सायंकाळी भरते डासांची जत्रा, हे उपाय कराल तर डास चुकूनही घरात पाय ठेवणार नाहीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.